Pune | धरणांमधून पाणी सोडण्याचं नियोजन अजिबात चुकलेलं नाही

| Updated on: Jul 23, 2021 | 9:08 PM

गेल्या 24 तासात 18 टीएमसी पाणी आल्याची माहितीही त्यांनी दिली. कोयना धरणात सध्या 82.50 टीएमसी पाणी आहे. सहानंतर पावसाने उसंत दिली आहे. आणखी पाऊस पडला तर परिस्तिथी बिघडेल. हातात काही राहणार नाही, म्हणून पाण्याचा जास्तीत जास्त विसर्ग करण्याच्या सूचना दिल्याची माहितीही यावेळी पाटील यांनी दिलीय.

Follow us on

कोल्हापूर आणि सांगलीमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. असं असलं तरी कोल्हापूर, सांगलीमध्ये यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिलीय. कृष्णा खोऱ्यात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे पाणी सोडावं लागलं. त्यामुळे सांगली आणि परिसरात पुरस्तिथी निर्माण झाली आहे. मात्र, यंत्रणा सज्ज असल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. कोयना धरणात एका दिवसात 12 टीएमसी पाणी येण्याचा विक्रम आहे. मात्र, गेल्या 24 तासात 18 टीएमसी पाणी आल्याची माहितीही त्यांनी दिली. कोयना धरणात सध्या 82.50 टीएमसी पाणी आहे. सहानंतर पावसाने उसंत दिली आहे. आणखी पाऊस पडला तर परिस्तिथी बिघडेल. हातात काही राहणार नाही, म्हणून पाण्याचा जास्तीत जास्त विसर्ग करण्याच्या सूचना दिल्याची माहितीही यावेळी पाटील यांनी दिलीय.