काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कॅलेंडरमध्येही फुले, शाहू, आंबेडकरांना स्थान नाही!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

मुंबई : राज्य सरकारच्या कालनिर्णयात महामानवांच्या पुण्यतिथी आणि जयंतीच्या तारखा नसल्यामुळे नवा वाद सुरु झालाय. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार राज्यात होतं तेव्हापासूनच कॅलेंडर काढलं जात होतं. त्यावेळीही या तारखा कॅलेंडरमध्ये नव्हत्या, असं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलंय. 2012 सालच्या कॅलेंडरचा एक फोटोही शेअर करण्यात आला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने नवीन वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित केली […]

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कॅलेंडरमध्येही फुले, शाहू, आंबेडकरांना स्थान नाही!
Follow us on

मुंबई : राज्य सरकारच्या कालनिर्णयात महामानवांच्या पुण्यतिथी आणि जयंतीच्या तारखा नसल्यामुळे नवा वाद सुरु झालाय. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार राज्यात होतं तेव्हापासूनच कॅलेंडर काढलं जात होतं. त्यावेळीही या तारखा कॅलेंडरमध्ये नव्हत्या, असं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलंय. 2012 सालच्या कॅलेंडरचा एक फोटोही शेअर करण्यात आला आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने नवीन वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. विरोधकांकडून फडणवीस सरकारच्या कॅलेंडरचा फोटो व्हायरल करण्यात आला आणि त्यानंतर मोठी टीका सुरु झाली. यानंतर भाजपनेही तातडीने स्पष्टीकरण देत काँग्रेस-आघाडी सरकारच्या काळापासूनच ही प्रथा होती, असं म्हटलंय.

भाजपचं स्पष्टीकरण

“विरोधकांना अज्ञानी म्हणणे हे लोकशाहीला धरून असणार नाही. येथे अपमान करण्याचाही हेतू नाही, पण ज्या पद्धतीने राज्यातील जनतेची दिशाभूल केली जातेय, तो प्रकार लज्जास्पद आहे. श्री विखे पाटील, श्री धनंजय मुंडे आपण विरोधी पक्षनेते. आपली जबाबदारी अधिक आहे. शासनाच्या कलेंडरमध्ये जयंती आणि राष्ट्रीय सणांचा उल्लेख करण्याची पद्धत आहे. पुण्यतिथी आपण साजरी करीत नाही, कारण तो स्मरण दिवस असतो आणि असेच कॅलेंडर वर्षानुवर्षे निघत आहे. आपण तर जयंतीचा सुद्धा उल्लेख करीत नव्हता. हे बघा २०१२ चे शासनाचे कॅलेंडर. दाखवा ६ डिसेंबर आणि जयंतीचा जीआर आपण काढलात २०१३ मध्ये. आम्हाला सांगा, हा सर्व प्रकार माहिती असताना केला गेला की अज्ञानातून? @supriya_sule ताई”, असं ट्वीट भाजपने केलंय.

काय आहे वाद?

या दिनदर्शिकेचे वितरण मंत्रालयासह सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये करण्यात आले आहे. 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतो. या दिवशी मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवर मोठ्या संख्येत जनसागर उसळतो. आंबेडकरांचे विचार मानणाऱ्यांमध्ये या दिवसाचं मोठं महत्त्व आहे. तरीही फडणवीस सरकारने मात्र सरकारी कॅलेंडरमध्ये या दिवसाला स्थान दिले नाही. कुठलाही उल्लेख 6 डिसेंबर या तारखेच्या रकान्यात केला नाही. तसेच, सरकारला महात्मा फुलेंचाही विसर पडला आहे. फुलेंच्या पुण्यतिथीचाही उल्लेख 28 नोव्हेंबर या तारखेच्या रकान्यात नाही.

सरकारच्या या दिनदर्शिकेत इतर सर्व जयंत्या आणि पुण्यातिथ्या देण्यात आल्या आहेत. मात्र, डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांचाच विसर सरकारला पडल्याने आता टीका सुरु झाली आहे.