Special Train : उन्हाळी सुट्टीत उत्तर प्रदेशसाठी कुर्ला स्थानकातून टीचर्स स्पेशल ट्रेन सुटणार

| Updated on: Apr 29, 2022 | 12:17 AM

ही शिक्षक विशेष गाडी कुर्ला ते बनारस अशी असून 2 मे 2022 रोजी कुर्ला एलटीटी स्थानकावरुन सुटणार आहे. या संदर्भातला संपूर्ण तपशिल रेल्वे पुढील एक-दोन दिवसात जाहीर करणार आहेत. आरक्षणाचे नियम पुर्वीप्रमाणे असल्याचे रेल्वेकडून सांगितले आहे.

Special Train : उन्हाळी सुट्टीत उत्तर प्रदेशसाठी कुर्ला स्थानकातून टीचर्स स्पेशल ट्रेन सुटणार
उन्हाळी सुट्टीत उत्तर प्रदेशसाठी कुर्ला स्थानकातून टीचर्स स्पेशल ट्रेन सुटणार
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : कोविड काळ सुरु झाल्यापासून रेल्वेने सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्व स्पेशल ट्रेन (Special Train) रद्द केल्या आहेत. याही वर्षी जवळजवळ सर्व स्पेशल ट्रेन रद्द आहेत. परंतु त्यामुळे उत्तर प्रदेशला जाणाऱ्या शिक्षकां (Teachers)ची मोठी गैरसोय झाली होती. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद टीचर्स स्पेशल ट्रेन सुरु व्हावी यासाठी प्रयत्नशील होती. 30 मार्च 2022 रोजी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना निवेदन दिले होते. त्यानुसार एक शिक्षक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवनाथ दराडे यांनी केले आहे. (Teachers special train will leave Kurla station for Uttar Pradesh during summer vacation)

स्पेशल ट्रेनते आरक्षण 29 एप्रिलपासून सुरु होणार

यासंदर्भात ॲड.आशिषजी शेलार यांनी 20 एप्रिल 2022 रोजी रेल्वे मंत्र्यांकडे पत्र व्यवहार केला होता. ॲड.आशिषजी शेलार यांनी यामध्ये व्यक्तिगत लक्ष घालून शिक्षकांची होणारी गैरसोय रेल्वेमंत्रालयाला अवगत केली. रेल्वे बोर्ड सदस्य कैलास वर्माजी, भाजपा नेते संजय उपाध्याय, आर.यू. सिंह, संजय पांडे व अमरजीत मिश्रा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी व्यक्तिगत संपर्क साधून टीचर्स स्पेशल ट्रेन करिता प्रयत्न केले. रेल्वे मंत्र्यांचे खाजगी सचिव यांनी या विषयात व्यक्तिगत लक्ष घातले. गाडी नंबर 01053 या टीचर्स स्पेशल ट्रेनचे आरक्षण 29 एप्रिल 2022 रोजी दुपारी 2 वाजता प्रत्यक्ष सुरु होणार आहे.

कुर्ला ते बनारस विशेष गाडी

ही शिक्षक विशेष गाडी कुर्ला ते बनारस अशी असून 2 मे 2022 रोजी कुर्ला एलटीटी स्थानकावरुन सुटणार आहे. या संदर्भातला संपूर्ण तपशिल रेल्वे पुढील एक-दोन दिवसात जाहीर करणार आहेत. आरक्षणाचे नियम पुर्वीप्रमाणे असल्याचे रेल्वेकडून सांगितले आहे. त्यामुळे शिक्षकांनी उद्यापासून आपल्या आरक्षणासाठी संबंधीत वेळेत उपस्थित राहून आपले आरक्षण नक्की करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उल्हास वडोदकर, आनंद शर्मा, प्रकाश मिश्रा, रविंद्रनाथ सिंह, निर्दोशकुमार दुबे, सावित्री यादव, ममता शर्मा यांनी केले आहे. (Teachers special train will leave Kurla station for Uttar Pradesh during summer vacation)

इतर बातम्या

Mumbai Crime : बॅग लिफ्टिंग करणाऱ्या टोळीला अटक, सीसीटीव्हीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

VIDEO : कल्याणमध्ये गावगुंडांचा नंग्या तलवारी नाचवत धिंगाणा, आरोपींचा हैदोस सीसीटीव्हीत कैद