नागपूरकर माहिला जगताचा आज लोकजागर, हजारोच्या संख्येने महिला मॅरेथॉनमध्ये मायलेकी धावणार

| Updated on: Mar 13, 2022 | 4:00 AM

सर्व स्पर्धकांनी कस्तुरचंद पार्कमध्ये एकत्रित येणे आवश्यक आहे. सर्व प्रथम पाच किलोमीटरची स्पर्धा सुरू होईल. त्यानंतर तीन किलोमीटरची स्पर्धा चालू होईल. शेवटी दोन किलोमीटरची फन रेस होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

नागपूरकर माहिला जगताचा आज लोकजागर, हजारोच्या संख्येने महिला मॅरेथॉनमध्ये मायलेकी धावणार
नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला.
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : भेदभाव सोडा महिला सुरक्षेला महत्त्व द्या, रस्ते अपघात टाळा, रस्ता सुरक्षेला महत्त्व द्या अशा अनेक संदेशाला घेऊन रविवारची पहाट महाराष्ट्रातील आगळ्यावेगळ्या महिला मॅरेथॉनने (Women Marathon) उघडणार आहे. नागपूर जिल्हा प्रशासनाने (Nagpur District Administration) या आयोजनाची पूर्ण तयारी केली आहे. रविवारी सकाळी हजारो महिला सात ते नऊ या काळात कस्तुरचंद पार्क येथे लोकजागर करतील अशी माहिती जिल्हाधिकारी आर विमला यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम सुद्धा या मॅरेथॉन स्पर्धेतून होणार आहे. सकाळी कस्तुरचंद पार्क जवळील माझी मेट्रो स्टेशनपर्यंतचा (My Metro Station) प्रवास महिलांना मोफत असणार आहे. त्यांना आलेला एसएमएस दाखवून मेट्रोमध्ये प्रवास करता येणार आहे.

17,400 महिलांची प्रत्यक्ष नोंदणी

जिल्हा प्रशासनाने या https://forms.gle/aj4DTYYMDhuoULwa6 लिंक वर नोंदणी करण्याचे सांगितले होते. शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 17,400 महिलांनी प्रत्यक्ष नोंदणी केली होती. सकाळी सात वाजता पालकमंत्री हिरवी झेंडी दाखवून पाच किलोमीटरच्या स्पर्धेचा शुभारंभ करणार आहेत. कस्तुरचंद पार्क येथे महिलांनी जमायचे आहे. संविधान चौकातून बरोबर सात वाजता पाच किलोमीटर स्पर्धेला त्यानंतर तीन किलोमीटर स्पर्धेला व नंतर फन रेसला सुरुवात होणार आहे.

लाखो रुपयांची बक्षिसे

जिल्हा प्रशासनाने बक्षिस जाहीर केली आहेत. यामध्ये पाच किलोमीटरमध्ये प्रथम येणाऱ्याला इ स्कूटर दिली जाणार आहे. द्वितीय 41 हजार, तृतीय 31 हजार, त्यानंतर अनुक्रमे चौथा ते दहाव्या क्रमांकापर्यंत 21, 15, 19, 8, 6, 5, 4 हजाराची बक्षिसे आहेत. पाच किलोमीटर साठी इ-स्कूटरसह एकूण 1 लक्ष 41 हजाराची बक्षिसाची रक्कम आहे. तीन किलोमीटरच्या गटासाठीसुद्धा पहिले बक्षीस 41 हजार रुपये आहे तर दुसऱ्या बक्षिसापासून दहाव्या बक्षिसापर्यंत अनुक्रमे 31, 21, 15, 10, 8, 6, 5, 4, 2 हजाराची बक्षिसे आहेत. तीन किलोमीटरसाठी एकूण बक्षिसांची रक्कम एक लाख रुपये आहे.

माझी मेट्रोकडून मोफत प्रवासाची भेट

महाराष्ट्रात अशा पद्धतीचा पहिलाच प्रयोग होत आहे. यामध्ये प्रत्येकाच्या घरातील महिला भगिनी उदात्त हेतूने या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यामुळे नागपूरकरांचे वैभव असणार्‍या माझी मेट्रोने देखील जिल्हा प्रशासनासोबत या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेच्या काळात प्रवास करणाऱ्या महिलांना मेट्रोकडून मोफत प्रवास मिळणार आहे. या स्पर्धेसाठी मेट्रोचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. या काळातील प्रवासासाठी कोणतेच शुल्क मेट्रो आकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

हरविलेला कुत्रा शोधा नि 50 हजार रुपये कमवा! एकीकडं श्वानप्रेम, तर दुसरीकडं तिरस्कार का?

माझ्या आयुष्याला योग्य वळण देणाऱ्या आईचे निधन, बच्चू कडू यांची ट्विटवरून शोकसंवेदना

Nagpur | कौटुंबिक समुपदेशन का गरजेचे, शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांनी सांगितले कारण