Nashik Corona : नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची किती आहे आकडेवारी, आजचा रिपोर्ट काय, घ्या जाणून…

| Updated on: Jan 24, 2022 | 12:21 PM

नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असली तरी, रुग्ण घरच्या घरी उपचार घेत ठणठणीत होतायत. त्यामुळे तिसऱ्या लाटेची भीती संपल्यात जमा आहे.

Nashik Corona : नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची किती आहे आकडेवारी, आजचा रिपोर्ट काय, घ्या जाणून...
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये ओमिक्रॉनच्या नव्या विषाणूमुळे कोरोना (Corona) रुग्णांची आकडेवारी वाढत आहेत. त्यातही विशेष म्हणजे नाशिक महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार सद्यस्थितीत 16 हजार 268 रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 425 ने घट झाली आहे. तसेच जिल्ह्यातील 4 लाख 24 हजार 434 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत 8 हजार 782 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असली तरी, रुग्ण घरच्या घरी उपचार घेत ठणठणीत होतायत. त्यामुळे तिसऱ्या लाटेची भीती संपल्यात जमा आहे.

येथे आहेत रुग्ण

उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 799, बागलाण 200, चांदवड 219, देवळा 291, दिंडोरी 375, इगतपुरी 262, कळवण 145, मालेगाव 211, नांदगाव 288, निफाड 854, पेठ 70, सिन्नर 599, सुरगाणा 53, त्र्यंबकेश्वर 194, येवला 274 असे एकूण 4 हजार 834 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 10 हजार 800, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 340 तर जिल्ह्याबाहेरील 294 रुग्ण असून असे एकूण 16 हजार 268 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 49 हजार 484 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णात नाशिक 126, बागलाण 19, चांदवड 20, देवळा 27, दिंडोरी 71, इगतपुरी 38, कळवण 35, मालेगाव 12, नांदगाव 27, निफाड 177, पेठ 12, सिन्नर 115, सुरगाणा 01, त्र्यंबकेश्वर 24, येवला 30 असे एकूण 734 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

नाशिक जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 94.57 टक्के, नाशिक शहरात 94.23 टक्के, मालेगावमध्ये 94.82 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 94.41 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 94.43 टक्के इतके आहे. दरम्यान, नाशिक ग्रामीणध्ये आतापर्यंत 4 हजार 257 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 41, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 782 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्याचे सध्याचे चित्र…

– 4 लाख 49 हजार 484 एकूण कोरोनाबाधित.

– एकूण रुग्णांपैकी 4 लाख 24 हजार 434 जणांना डिस्चार्ज.

– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले 16 हजार 268 पॉझिटिव्ह रुग्ण.

– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 94.43 टक्के.

इतर बातम्याः

Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!

Nashik Trees | पर्यावरण मंत्र्यांच्या एका सूचनेमुळे 200 वर्षे पुरातन वटवृक्षासह 450 झाडे वाचणार, प्रकरण काय?

Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी