सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचा किलबिलाट वाढणार, पर्यटकांना आकर्षित करणारी पक्षीघरं नाशिकमध्ये वाढली पाहिजे : छगन भुजबळ

| Updated on: Oct 26, 2021 | 12:23 PM

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारे पक्षी घरासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प नाशिकमध्ये वाढले पाहिजे, असे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचा किलबिलाट वाढणार, पर्यटकांना आकर्षित करणारी पक्षीघरं नाशिकमध्ये वाढली पाहिजे : छगन भुजबळ
Chhagan bhujbal
Follow us on

नाशिक : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारे पक्षी घरासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प नाशिकमध्ये वाढले पाहिजे, असे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. आज नाशिक येथील पुरीया पार्क सर्कल, दिंडोरी नाका पंचवटी या ठिकाणी उभारण्यात आलेले पहिले पक्षी पार्कचे उदघाटनावेळी ते बोलत होते.

नाशिकचं पक्षी घर

पंचवटीतील परशुराम पुरिया पार्कमध्ये ६५ फुटी पक्षी घर साकार झाले आहे. या पक्षी घराचा बेस जमिनीपासून दहा फुट असून ते एकूण १२ फुट उंच आहे.या अनोख्या संकल्पनेतून पक्षांच्या दाणापाण्याची सोय होणार असून रेडीमेड घरट्यामुळे पक्ष्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. या पक्षी घरात पक्षांसाठी एकूण ८०० रेडीमेड घरटी असून सुमारे चार हजार पक्षी यात राहू शकणार आहे. सामाजिक संस्था तसेच नागरिकांच्या मदतीने या पक्षी घराची देखभाल करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

पक्षीघर पर्यटन वाढीसाठी अनोखा उपक्रम

यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की गुजरात मध्ये पक्षीघर ही संकल्पना राबवित असल्याने म्हैसने या तालुक्यात ठिकठिकाणी अशी पक्षीघरे पहायला मिळत आहे. त्याचधर्तीवर नगरसेवक गुरमीत बग्गा यांच्या संकल्पनेतून नाशिक येथे हे पहिले पक्षी घर विकसित करण्यात आले आहे. हा नाविन्यपूर्ण उपक्रम नाशिक शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी राबविण्यात यावा. त्यातून पक्षांची संख्या वाढणार आहे. तसेच पर्यटन वाढीसाठी देखील हा अनोखा उपक्रम ठरणार आहे.

सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचा किलबिलाट वाढणार

सिमेंटच्या जंगलात किमान पंचवटी परिसरात पक्ष्यांची किलबिलाट वाढणार आहे. नाशिक शहर व परिसरातील वातवरण अतिशय चांगले असल्याने नाशिक शहर व परिसरात असे प्रकल्प राबविण्यात यावेत. त्यातून पर्यटन देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नागरिकांना निसर्ग जवळुन समजुन घेता यावा व भावी पिढीला निसर्गाबाबत अधिक सजगता यावी, यासाठी देखील असे उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे.

हे ही वाचा :

ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाशिक महापालिकेत नोकर भरतीचा बार; आयटी हब, लॉजिस्टिक पार्कसाठी जोर

गॅस सिलिंडर स्फोटातील दोघांचा नाशिकमध्ये मृत्यू; चार कामगारांवर उपचार सुरू