Accident | घाट चढत असताना कंट्रोल सुटला, कसारा घाटात कंटेनर पलटी, चालक गंभीर जखमी

| Updated on: Dec 26, 2021 | 6:02 PM

कंटेनर पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या चालकाला तत्काळ इगतपुरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

1 / 4
मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात अपघात झाला आहे. एक कंटेनर घाट चढत असताना घाटातच पलटी झाला आहे. MH 04 JK 7602 या नंबरचा कंटेनर पलटी होऊन अपघातग्रस्त झाला.

2 / 4
कंटनेर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटून हा अपघात घडला आहे. घाट चढत असताना चालकाना गाडी कंट्रोल करता आली नाही आणि गाडीवरील नियंत्रण जाऊन घाटात कंटेनर पलटी झाला.

3 / 4
कंटेनर पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या चालकाला तत्काळ इगतपुरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

4 / 4
कसारा घाट चढत असताना टोप बार जवळ हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी तत्काळ खबरदारी घेतली.