धनुष्यबाणावरील पुढील सुनावणीत निकाल ३० जानेवारीला लागणार काय?; कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना काय वाटतं?

| Updated on: Jan 20, 2023 | 9:41 PM

निवडणूक आयोगापुढं खरं काय हा प्रश्न आहे. विवादित प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी ते लेखी युक्तिवाद आणि कागदपत्र यांची सांगड घालावी लागेल.

धनुष्यबाणावरील पुढील सुनावणीत निकाल ३० जानेवारीला लागणार काय?; कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना काय वाटतं?
उज्ज्वल निकम
Image Credit source: tv 9
Follow us on

मुंबई : शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या वकिलांना आज निवडणूक आयोगापुढं आपआपला युक्तिवाद केला. निवडणूक आयोगानं युक्तिवाद लेखी स्वरुपात सादर करण्यास सांगितला. त्यानंतर पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी होणार आहे. या सुनावणीत शिवसेना कुणाची तसेच धनुष्यबाण चिन्ह कोणत्या गटाला मिळणार, याचा निर्णय लागण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बोलताना कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगानं ही बाब स्पष्ट केली. दोन्ही गटांच्या वकिलांनी जो काही तोंडी युक्तिवाद केला तो लेखी स्वरुपात द्यावा. त्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ३० तारखेला आम्ही याचा निर्णय देऊ असं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.

दोन्ही गटांकडून दोन मुद्दे मांडण्यात आले. एखाद्या राजकीय पक्षाला निवडणूक आयोग मान्यता देतो. तेव्हा त्या राजकीय पक्षाला आपली घटना निवडणूक आयोगासमोर सादर करावी लागते. कुठल्याही राजकीय पक्षाला मान्यता देताना ती घटनेनुसार निवडणूक आयोग देते, असं उज्ज्वल निकम म्हणाले.

घटनेनुसार, निवडणूक प्रतिनिधी राष्ट्रीय कार्यकारिणी यांचे बहुमत कोणाकडं हा महत्त्वाचा भाग असतो. कपिल सिब्बल यांचा आजचा युक्तिवाद हा ठाकरे गटाकडे बहुमत असल्याचा होता. शिंदे गटानं आम्ही नेते आहोत, असा युक्तिवाद केला.

पक्ष प्रमुखाच्या नियुक्तीत विसंगती

नेता निवडीची प्रक्रिया अवलंबिली गेली की, नाही हे निवडणूक आयोग तपासेल. पक्षाच्या घटनेनुसार, राष्ट्रीय कार्यकारिणी आहे की नाही, हेही तपासावे लागेल. त्यांची प्रतिज्ञापत्र कोणाकडं आहेत.
सिब्बल यांच्या युक्तिवादात दुसरा असा भाग होता की, पक्ष प्रमुखाच्या नियुक्तीमध्ये विसंगती आहे. हे आयोगाच्या निदर्शनास आणले आहे, असंही निकम यांनी सांगितलं.

हेही तपासावं लागेल

निवडणूक आयोगापुढं खरं काय हा प्रश्न आहे. विवादित प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी ते लेखी युक्तिवाद आणि कागदपत्र यांची सांगड घालावी लागेल. निवडून आलेले लोकप्रतिनिधी कोणाच्या बाजूनं हेही तपासावे लागेल, असं मत उज्ज्वल निकम यांनी म्हंटलं.