ना वही, ना पेन, या वर्गातील विद्यार्थ्यांच्या हातात थेट एके-47

| Updated on: Aug 17, 2021 | 9:46 PM

नागपूर : एक असा क्लास, जिथे ना खडू-फळा आहे ना, पेन-वही… तर या अनोख्या वर्गात आहे चक्क एके- 47, पिस्तुल, 9 एमएम कार्बाईन, मॅगझिन आणि काडतुसं… रशियात तयार झालेल्या रायफल या मुलांच्या हातात आहेत. या रायफल ऑटोमॅटिक असून 30 पेक्षा जास्त राऊंडपर्यंत एकावेळी फायर करण्याची क्षमता यामध्ये आहे. एके -47 नंतर संपूर्णपणे ऑटोमॅटिक असलेली स्वयंचलीत […]

ना वही, ना पेन, या वर्गातील विद्यार्थ्यांच्या हातात थेट एके-47
संरक्षण दलात सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव लवकरच लागू होणार
Follow us on

नागपूर : एक असा क्लास, जिथे ना खडू-फळा आहे ना, पेन-वही… तर या अनोख्या वर्गात आहे चक्क एके- 47, पिस्तुल, 9 एमएम कार्बाईन, मॅगझिन आणि काडतुसं… रशियात तयार झालेल्या रायफल या मुलांच्या हातात आहेत. या रायफल ऑटोमॅटिक असून 30 पेक्षा जास्त राऊंडपर्यंत एकावेळी फायर करण्याची क्षमता यामध्ये आहे.
एके -47 नंतर संपूर्णपणे ऑटोमॅटिक असलेली स्वयंचलीत 9 एमएम पिस्तुल. त्यानंतर महत्त्वाची 9 एमएम कार्बाईन.. शत्रूंशी लढण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी याचा वापर केला जातो. देशाचं भविष्य ज्या लहान मुलांच्या खांद्यावर आहे, त्यांच्याचसाठी लागलेला हा सुरक्षेचा स्पेशल क्लास आहे.
देशाची अंतर्गत सुरक्षा ज्यांच्या भरवशावर आहे त्या पोलिसांनीच चिमुकल्या विद्यार्थ्यांचा हा अनोखा क्लास लावलाय. पोलीस कशाप्रकारे समाजाचं रक्षण करतात….पोलिसांच्या कामाची पद्धत काय… ते कुठली शस्त्र वापरतात. याची माहिती या चिमुकल्या विद्यार्थ्यांना व्हावी म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी हा विशेष क्लास लावण्यात आला होता.
देशाचं संरक्षण आणि शत्रूंवर मात करण्याचे संस्कार लहानपणापासूनच रुजणं गरजेचं आहे. त्यामुळे भविष्यातील जबाबदार नागरिक घडवताना पुस्तकी ज्ञानासोबतच हा समाज, बलाढ्य देश कसा चालतो याचं व्यावहारिक ज्ञानही आजच्या पिढीला असणं गरजेचं आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपुरातील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी हा विशेष क्लास लावण्यात आला होता.