अति गोड खाल्ल्याने अर्धांगवायूचा झटका

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

रणजीत जाधव, टीव्ही9 मराठी, पुणे : दिवाळीत अति प्रमाणात गोड खाल्ल्याने पुण्यातील राजगुरुनगर येथील तरुणाला अर्धांगवायूचा झटका आला. निलेश राळे असे या तरुणाचे नाव असून, त्याला पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. निलेश हा शेतकरी कुटुंबातील तरुण आहे. तो आई-वडिलांसोबत खेड तालुक्यातील कोये गावात राहतो. कुस्तीची आवड असलेला निलेश नित्य नेमाने व्यायामही करतो, त्यामुळे तो […]

अति गोड खाल्ल्याने अर्धांगवायूचा झटका
Follow us on

रणजीत जाधव, टीव्ही9 मराठी, पुणे : दिवाळीत अति प्रमाणात गोड खाल्ल्याने पुण्यातील राजगुरुनगर येथील तरुणाला अर्धांगवायूचा झटका आला. निलेश राळे असे या तरुणाचे नाव असून, त्याला पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. निलेश हा शेतकरी कुटुंबातील तरुण आहे. तो आई-वडिलांसोबत खेड तालुक्यातील कोये गावात राहतो. कुस्तीची आवड असलेला निलेश नित्य नेमाने व्यायामही करतो, त्यामुळे तो तब्बेतीने सदृढ आहे.

निलेशने दिवाळीत करण्यात आलेल्या फराळातील करंज्या आणि लाडू या गोड पदार्थांचे अति प्रमाणात सेवन केल्याने त्याच्या शरिरातील पोटॅशियमचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे त्याला अर्धांगवायूचा झटका आला. त्याच्या संपूर्ण शरीराची हालचाल बंद झाली. असे डॉक्टरांनी सांगितले.

निलेश त्याच्या बहिणीला सासरी सोडण्यासाठी गेला होता. तो घरी परतल्यानंतर अचानक त्याला अशक्तपणा जाणवायला लागला. त्याच्या स्नांयूची हालचाल बंद झाली, पण नेमकं काय होत आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही. त्यानंतर त्याला लगेच राजगुरूनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक्सरे आणि एमआरआयमध्ये त्याच्या आजाराचं निदान होऊ शकलं नाही. त्यानंतर निलेशला १२ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं. परंतू त्याच्या आजाराचं निदान होत नसल्यानं त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी इसीजी आणि काही रक्ताच्या चाचण्या केल्या. त्यात निलेशच्या रक्तातील पोटॅशियमची पातळी कमी झाल्याचे निदर्शनास आले. दिवाळीत गोड पदार्थ आणि मिठाई जास्त खाल्ल्याने त्याच्या रक्तातील पोटॅशियम कमी झालं होतं, अशी माहिती जहांगीर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिली. निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ त्याच्यावर उपचार सुरू केले. त्यामुळे त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली.

मात्र गोड खाल्याने असा प्रसंग ओढवेल अशी कल्पनाही या तरुणाने कधी केली नसेल. कुठल्याही गोष्टीचे अतिसेवन हे नुकसानदायकचं असते, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले. त्यामुळे काहीही खाताना त्याचे अतिसेवन होणार नाही याची काळजी घ्या.