पुण्यात काय पण होऊ शकतं; लैँगिक शिक्षणाच्या प्रशिक्षणाची ऑनलाईन बुकींग

| Updated on: Sep 15, 2022 | 9:42 PM

प्रशिक्षणाने याबाबत एक जाहिरात केली आहे. या जाहिरातीचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पुण्यात काय पण होऊ शकतं; लैँगिक शिक्षणाच्या प्रशिक्षणाची ऑनलाईन बुकींग
Follow us on

पुणे : पुण्यात लैंगिक शिक्षणाच्या( sex education) प्रशिक्षणाची ऑनलाईन बुकींग सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रशिक्षणाचे ऑनलाईन बुकिंग केलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  प्रशिक्षणाने याबाबत एक जाहिरात केली आहे. या जाहिरातीचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशनच्या वतीनं या प्रशिक्षणाची जाहिरात करण्यात आल्याचे समजते.

लैगिंक शिक्षणाचे प्रशिक्षण देणारी ही जाहीर सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशनच्या वतीने या प्रशिक्षणाची जाहिरात देण्यात आली आहे.

पुण्यात लैंगिक शिक्षणाच्या प्रशिक्षणाची ऑनलाईन बुकिंग झाल्याच्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून या लैंगिक प्रशिक्षणाचा आयोजन करण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावरती याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

लैंगिक प्रशिक्षणाचे ऑनलाईन बुकिंग करण्यात आले आहे. एक, दोन आणि तीन ऑक्टोबर दरम्यान पुण्यात हे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. विशेष म्हणजे या दरम्यान नवरात्रोत्सव देखील होत आहे.

नवरात्रोत्सवादरम्यान या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेक पुणेकरांनी यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अशा पद्धतीने लैंगिक शिक्षणाचे प्रशिक्षण देता येते का? सहकारी संस्था अशा प्रकारचे प्रशिक्षण देऊ शकतात का? या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळी ही जाहिरात व्हायरल झाली. यानंतर पुणे पोलिसांकडे कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सेक्स एज्युकेशन किंवा लैंगिक शिक्षण देणार असतील तर ते डॉक्टरांकडून दिले जावे. मात्र, आयोजकांमध्ये डॉक्टर नसल्याची माहिती समोर येत आहे.

हा एक बिझनेस फंडा असून व्यवसाय वाढवण्यासाठी अशी जाहिरात करण्यात येत आहे. जाहिरातीचा फोटो व्हायरल करुन पुणे शहरांमध्ये हे नको ते उद्योग करणाऱ्या लोकांवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात करावा अशी मागणी देखील केली जात आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केली आहे.