या गावातील विद्यार्थ्याचा व्हिडीओ व्हायरल; शिक्षकांवरच केले असे आरोप, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Feb 02, 2023 | 9:23 PM

कोसंबी गावातील विद्यार्थांच्या या व्हिडिओची योग्य चौकशी होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांवर दबाव टाकून त्यांचे बयान बदलविण्यात येण्याची देखील शक्यता आहे.

या गावातील विद्यार्थ्याचा व्हिडीओ व्हायरल; शिक्षकांवरच केले असे आरोप, नेमकं प्रकरण काय?
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील कोसंबी या गावातील विद्यार्थ्यांचा (Students) एक व्हिडीओ भलताच व्हायरल झालाय. शाळेत भरदुपारी येणारे शिक्षक आणि अभ्यासक्रम सोडून इतर काम करणारे गुरुजी यांच्याबाबत विद्यार्थ्यांनी व्हिडीओत तक्रारी केल्या आहेत. मात्र या व्हिडिओमुळे उघड झालेलं सत्य लपवण्यासाठी शिक्षक एकजूट होत असल्याचं समोर आलंय. मनात येईल तेव्हा शाळेत यायचं. वाटेल ते शिकवायचं आणि मनात येईल ते मुलांना बोलायचं. एका व्हिडिओच्या माध्यमातून मुलांनी आपल्या मनातील भावनांना आणि शाळेतील सत्यपरिस्थतीला वाचा फोडली.

दुसरीकडे शाळेतल्या विद्यार्थ्यांना या बाबत विचारलं तर त्यांच्यात एकवाक्यता नव्हती. शाळेत शिक्षक वारंवार अनुपस्थित राहतात, हा मात्र समान सूर होता. हा व्हिडिओ म्हणजे एक षडयंत्र असून, कुणाच्या तरी सांगण्यावरून मुलांनी हे आरोप केल्याचा धोशा शिक्षकांनी एकसुरात लावलाय.

चौकशीनंतर कारवाईचे संकेत

या व्हिडिओमुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासनात देखील मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिलेत. या चौकशीनंतर कारवाई करण्याचे संकेत माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी दिले आहेत.

विद्यार्थ्यांवर दबाव येणार?

कोसंबी गावातील विद्यार्थांच्या या व्हिडिओची योग्य चौकशी होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांवर दबाव टाकून त्यांचे बयान बदलविण्यात येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे ही चौकशी फक्त एक उपचार ठरू नये हीच अपेक्षा आहे.

 

जिल्ह्यातील कोसंबी या गावातील विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. शाळेत शिक्षक गैरहजर असतात आणि अभ्यासक्रम शिकवत नाहीत असा विद्यार्थ्यांचा आरोप होता. ग्रामीण भागातील शिक्षणाची सत्यस्थिती दर्शविणारा व्हिडिओ भलताच व्हायरल होतोय. सत्य लपवण्यासाठी शिक्षकांची एकजूट दिसून येत आहे.