विदर्भातील उद्योगावर कोळसा संकट, कामगारांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता

| Updated on: Oct 30, 2021 | 3:59 PM

विदर्भातील उद्योगांपुढे कोळशा अभावी मोठं संकट निर्माण झालं आहे. कोळशाचे संकट आधी वीज निर्मितीच्या मुळावर होते उठले. आता राज्यातील उद्योगांपुढे मोठं संकट उभे ठाकलंय.

विदर्भातील उद्योगावर कोळसा संकट, कामगारांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता
उद्योगांवर कोळसा संकट
Follow us on

चंद्रपूर : विदर्भातील उद्योगांपुढे कोळशा अभावी मोठं संकट निर्माण झालं आहे. कोळशाचे संकट आधी वीज निर्मितीच्या मुळावर होते उठले. आता राज्यातील उद्योगांपुढे मोठं संकट उभे ठाकलंय. सरकारी कोळसा कंपनी WCL 92 टक्के कोळसा वीज कंपन्यांना देते. विदर्भातील 400 छोटे-मध्यम आणि 25 मोठया उद्योगांपुढे समस्या निर्माण झालंय. तातडीने उपाय न काढल्यास या उद्योगातील कामगारांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झालीय.

विदर्भातील उद्योगांपुढं संकट

विदर्भातील उद्योगांपुढे कोळश्याअभावी मोठं संकट निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वी देशात कोळश्याच्या टंचाईमुळे वीज उत्पादन क्षेत्रापुढे मोठं संकट उभं झालं होतं. त्यामुळे सरकारने तातडीने सर्व कोळसा वीज केंद्रांकडे वळता केला आणि हे संकट टळलं. मात्र आता या मुळे राज्यातील उद्योगांपुढे मोठं संकट निर्माण झालं आहे.

92 टक्के कोळसा वीज कंपन्यांना 8 टक्के कोळसा उद्योगांना

सध्या राज्यातील सर्व कोळसा हा वीज निर्मितीसाठी प्राधान्याने दिला जात असल्यामुळे उद्योगांपुढे मोठं संकट निर्माण झालंय. मध्य भारतात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड ही सरकारी कोळसा कंपनी कोळसा उत्खननाचं काम करते. WCL च्या एकूण उत्पादनापैकी 92 टक्के कोळसा हा वीज कंपन्यांना तर 8 टक्के हा उद्योगांना दिला जातो. मात्र, सध्या उत्पादनात घट आल्यामुळे विदर्भातील उद्योगांना कोळसा मिळत नाही आहे. तर दुसरीकडे WCL चा कोळसा उपलब्ध होत नसल्याने या उद्योगांना खुल्या बाजारातून कोळसा विकत घ्यावा लागतोय.

टंचाई मुळे खुल्या बाजारात कोळश्याचे भाव 7 हजार रुपये टन वरून 13 हजारांपर्यंत गेले आहेत. सोबतच कोळश्यात भेसळ देखील होत आहे. कोळश्याच्या या संकटामुळे विदर्भातील 400 छोटे-मध्यम आणि 25 मोठया उद्योगांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. स्टील, पेपर, केमिकल, सिमेंट या सारख्या उद्योगांना फरनेस आणि बॉईलर साठी कोळश्याची गरज असते. मात्र, राज्य आणि केंद्र सरकारने यावर तातडीने उपाय न काढल्यास ऐन दिवाळीत उद्योगांपुढे मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे, अशी शक्यता हेमंत कुलकर्णी, संचालक, महाराष्ट्र कार्बन यांनी व्यक्त केलीय.

मधुसूदन रुंगठा, अध्यक्ष, विदर्भ फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज यांनी कोळशाचे संकट आधी वीज निर्मितीच्या मुळावर उठले होते. मात्र, कोळसा आधारित शेकडो उद्योग यामुळे प्रभावित झाल्याचे चित्र पुढं आल्याने आगामी काळात मोठ्या उद्योगांना सहाय्यभूत ठरणारे लघु उद्योग किती काळ तग धरतील, अशी भीती व्यक्त केली आहे.

इतर बातम्या:

Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?

Diwali Festival : पुण्यात 125 डेसीबलपेक्षा जास्त आवाजाचे साखळी फटाके वाजवण्यास बंदी

Chandrapur Vidarbha industry facing coal shortage issue and also hike in rates