गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवादी चकमकीतील मृतांची संख्या 27 वर

| Updated on: Nov 16, 2021 | 11:52 PM

सुखलाल उर्फ सुकलाल रामसाय परचाकी हा धानोरा तालुक्यातील रहिवासी आहे. त्याच्यावर नक्षलवादी चकमकी 20 गुन्हे, खुनाचे गुन्हे 16, जाळपोळ 1, खुनाचा प्रयत्न करणे 8, असे गडचिरोली जिल्ह्यात एकूण 51 गुन्हे दाखल आहेत.

गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवादी चकमकीतील मृतांची संख्या 27 वर
गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवादी चकमकीतील मृतांची संख्या 27 वर
Follow us on

गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जंगली भागात शनिवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या 27 वर पोहोचली आहे. शोध मोहिमेदरम्यान मंगळवारी सुखलाल परचाकी या नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला आहे. सुखलालवर 25 लाख रुपयांचे बक्षीस होते. गडचिरोली आज नक्षलविरोधी पोलिस पथकाने चकमक झालेल्या परिसरात पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन केलं. या ऑपरेशनदरम्यान परचाकीचा मृतदेह सापडला.

सर्च ऑपरेशनदरम्यान सापडला मृतदेह

सुखलाल उर्फ सुकलाल रामसाय परचाकी हा धानोरा तालुक्यातील रहिवासी आहे. त्याच्यावर नक्षलवादी चकमकी 20 गुन्हे, खुनाचे गुन्हे 16, जाळपोळ 1, खुनाचा प्रयत्न करणे 8, असे गडचिरोली जिल्ह्यात एकूण 51 गुन्हे दाखल आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटातही त्याचा सहभाग होता. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक (एसपी) अंकित गोयल यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी झालेल्या चकमकीच्या ठिकाणी जंगलात शोध मोहिमेदरम्यान परचाकीचा मृतदेह सापडला.

परचाकीवर 25 लाखाचे बक्षिस होते

परचाकी हा माओवाद्यांच्या विभागीय समितीचा (DVC) सदस्य होता, ज्याला नुकतीच दंडकारण्य विशेष प्रादेशिक समिती (DKSZCM) मध्ये बढती देण्यात आली होती. परचाकीवर 25 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. शनिवारी C-60 कमांडोसोबत सुमारे दहा तास चाललेल्या चकमकीत कुख्यात नक्षली मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षलवादी मारले गेले. यावेळी चार पोलीस कर्मचारीही जखमी झाले. आता आणखी एक मृतदेह सापडल्याने या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या 27 झाली आहे, असेही एसपींनी सांगितले.

डीआयजीच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं होतं ऑपरेशन

डीआयजीच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन पार पडलं. अॅडिशनल एसपी समीर, अॅडिशनल एसपी अनुज तारी यांचं मार्गदर्शन लाभलं. तसेच सोमय मुंडे हे ग्राऊंडवर लीड करत होते. प्रचंड गोळीबार होऊन सुद्धा पोलीस आणि जवान लढले. आमच्याकडून मिळालेलं प्रत्युत्तर पाहून बाकीचे नक्षल पळून गेले आहेत. त्यांचा शोध घेत आहोत, असं अंकित गोयल यांनी गडचिरोलीतील चकमकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. सकाळी 6 वाजता ही चकमक सुरू झाली होती. त्यानंतर तब्बल 9 तासही चकमक सुरू होती. (Death toll rises to 27 in Gadchiroli police-Naxal clashes)

इतर बातम्या

चाइल्ड पोर्नोग्राफी : देशातील 14 राज्यांत सीबीआयचे छापे; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

कोल्हापुरात एमडी ड्रग्सचा कोट्यवधीचा साठा जप्त! फार्महाऊसवर सुरु होता कारखाना, एकाला अटक