श्रावण शुध्द पुत्रदा एकादशीनिमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची पंढरपूरमध्ये अलोट गर्दी, दर्शनासाठी 5 किलो मीटर लांब रांग…

| Updated on: Aug 08, 2022 | 2:14 PM

पुत्रदा एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरमध्ये दाखल झाल्याने तेथील हाॅटेल आणि मठ सर्वच हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे. यामुळे आता येणाऱ्या भाविकांना राहण्याची सोय करावी लागणार आहे.

श्रावण शुध्द पुत्रदा एकादशीनिमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची पंढरपूरमध्ये अलोट गर्दी, दर्शनासाठी 5 किलो मीटर लांब रांग...
Follow us on

पंढरपूर : श्रावण शुध्द पुत्रदा एकादशी (Ekadashi) निमित्ताने श्री विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळतंय. जवळपास तीन लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. पंढरी नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे. विठ्ठल दर्शनासाठी रांगा पाच किलो मिटर लांब लागल्या आहेत. भाविकांची गर्दी (Crowd) सातत्याने वाढतच जात आहे. दर्शनासाठी तब्बल 8 तास भाविकांना रांगेमध्ये उभे राहवे लागत आहे. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनाचे खास महत्व असल्याने भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरमध्ये दाखल झाले आहेत. पंढरपुरमधील (Pandharpur) हाॅटेल आणि मठ सर्वच हाऊसफुल्ल झाल्याचे बघायला मिळते आहे.

तब्बल 8 तास भाविक रांगेमध्ये

श्रावण शुध्द पुत्रदा एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरमध्ये दाखल झाले आहेत. विठ्ठल दर्शनासाठी भाविकांना तब्बल आठ तास रांगेमध्ये उभे राहवे लागत आहे. संपूर्ण पंढरीनगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली असून भाविकांची संख्या दर्शनासाठी वाढतच आहे.

हे सुद्धा वाचा

श्री विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनाचे खास महत्व आहे. यामुळेच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सातत्याने पंढरपुरमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठं मोठ्या रांगा या बघायला मिळतायंत.

पंढरपुरमधील हाॅटेल आणि मठ सर्वच हाऊसफुल्ल

पुत्रदा एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरमध्ये दाखल झाल्याने तेथील हाॅटेल आणि मठ सर्वच हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे. यामुळे आता येणाऱ्या भाविकांना राहण्याची सोय करावी लागणार आहे. पंढरपुरमधील ही गर्दी पुढील दोन दिवस अशीच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विठ्ठल दर्शनासाठी रांगा पाच किलो मिटर लांब

श्रावण शुध्द पुत्रदा एकादशी निमित्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविक पंढरपुरमध्ये दाखल झाले आहेत. फक्त राज्यातूनच नाही तर बाहेरील राज्यातून देखील भाविक पंढरपुरमध्ये आले आहेत. पहाटेपासूनच विठ्ठल दर्शनाखाली नागरिकांची मोठी रांग बघायला मिळते आहे. विठ्ठल दर्शनासाठी रांगा पाच किलो मिटर लांब लागल्या आहेत.