महाविकास आघाडीच्या माजी नेत्यांवर दबावासाठी अटक, नीलेश लंके यांचा आरोप

| Updated on: Nov 11, 2022 | 7:00 PM

जितेंद्र आव्हाड हे अभ्यासू नेतृ्त्व आहे. त्यांची भूमिका स्पष्टपणे बाहेर आली.

महाविकास आघाडीच्या माजी नेत्यांवर दबावासाठी अटक, नीलेश लंके यांचा आरोप
नीलेश लंके यांचा आरोप
Image Credit source: tv 9
Follow us on

नगर : माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली. हर हर महादेव या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप होता. पोलीस बळ, ईडीचा वापर केला जातो. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पोलीस बळाचा वापर केला जातो. माजी मंत्री तसेच आमदारांवर दबाव आणण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी केलाय.

संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाली. कोर्टानं ईडीवर ताशेरे ओढले. राऊतांची अटक चुकीची असल्याचं कोर्टानं म्हटलंय. पोलीस बळाचा किती चुकीचा वापर करावा, हे आजही पाहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाड हे जबाबदार माजी मंत्री आहेत. हे शंभर टक्के चुकीचं आहे, असंही नीलेश लंके यांनी म्हंटलंय.

जितेंद्र आव्हाड हे अभ्यासू नेतृ्त्व आहे. त्यांची भूमिका स्पष्टपणे बाहेर आली. हर हर महादेवमधील अशोभनीय वक्तव्यावर त्यांचा आक्षेप होता. ते तिथून काढलं पाहिजे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे. परंतु, मनसेनं या कारवाईचं समर्थन केलंय. चित्रपट बंद करण्याचा अधिकार या नेत्यांना कुणी दिला, असं मनसेचं म्हणणं आहे. तसेच चित्रपटाच्या दिग्दर्शकांनीही कारवाईचं समर्थन केलं. यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस वर्सेस मनसे असा हा वाद निर्माण झाला.

ठाण्यातील एका मॉसमध्ये हा चित्रपट बंद पाडण्यात आला. यावेळी मारहाण झाल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला. जितेंद्र आव्हाड यांच्यासह सुमारे शंभर कार्यकर्ते होते. या सर्वांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आली होते. आज जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे नेते वक्तव्य करत आहेत.