वाशिम: चारचाकी उलटून अपघात; गर्भवती महिलेसह चार जण गंभीर जखमी

| Updated on: Nov 21, 2021 | 7:05 AM

कार उटल्याने झालेल्या अपघातामध्ये एका  गर्भवती महिलेसह चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात जिल्ह्यातील मांडवा फाट्याजवळ असलेल्या वळणावर घडला.

वाशिम: चारचाकी उलटून अपघात; गर्भवती महिलेसह चार जण गंभीर जखमी
Follow us on

वाशिम – कार उटल्याने झालेल्या अपघातामध्ये एका  गर्भवती महिलेसह चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात जिल्ह्यातील मांडवा फाट्याजवळ असलेल्या वळणावर घडला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र चालकाचा वाहनावरीला ताबा सुटल्याने गाडी वळणार पटली झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने, गाडी वळणावर पलटी झाली आणि शेजारीच असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली.

जखमींवर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार

या घटनेमध्ये एका गर्भवती महिलेसह चार जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व जखमींवर कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

चारचाकीचा चुराडा

अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये चारचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. कारचा समोरचा भाग पूर्णपणे डॅमेज झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते.

संबंधित बातम्या 

एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा डाव; हरिभाऊ राठोड यांचा गंभीर आरोप

आर्यनप्रकरणातही फर्जीवाडा उघड, वानखेडेंना निलंबित करा; नवाब मलिक यांची मागणी

VIDEO: ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं…’ आझाद मैदान दुमदुमले, कोणत्याही परिस्थितीत परबांच्या बंगल्यावर धडक देणारच; एसटी कामगार इरेला पेटले