खाणकामात डिप्लोमा, ४८ वर्षे भूमिगत राहून काम, नक्षल चळवळीचा हा नेता हरपला

| Updated on: Jun 05, 2023 | 3:44 PM

सुदर्शन यांनी आदिलाबाद, गडचिरोली, बस्तर ते पूर्व गोदावरीपर्यंत विस्तारित रिट्रीट झोन तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तत्कालीन सीपीआय-एमएल पीपल्स वॉरचे ते वन संपर्क समिती सदस्य होते.

खाणकामात डिप्लोमा, ४८ वर्षे भूमिगत राहून काम, नक्षल चळवळीचा हा नेता हरपला
Follow us on

व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : आनंद आणि दुला या नावाने कटकम सुदर्शन हे ओळखले जात होते. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते सुमारे 48 वर्षे भूमिगत होते. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सुदर्शन हे सीपीआय (माओवादी) केंद्रीय समितीचे सदस्य आणि पॉलिट ब्युरोचे सदस्य होते. सुर्दशन हे एक निर्विवाद माओवादी विचारसरणी आणि फील्ड क्राफ्टमधील तज्ज्ञ होते. ते मूळचा आदिलाबाद जिल्ह्यातील बेल्लमपल्लीचे होते. 1978 पासून क्रांतिकारी विचारसरणीकडे आकर्षित होण्यापूर्वी त्यांनी खाणकामात डिप्लोमा केला होता.

कटमक सुदर्शन हे सीपीआय-एमएल पीपल्स वॉर विचारसरणीकडे आकर्षित झाले. पक्षाने 1978 मध्ये सुरू केलेल्या गावाकडे परत मोहिमेत भाग घेतला. त्यांनी कोळसा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले. 20 एप्रिल रोजी कुख्यात इंद्रावेली गोळीबारानंतर क्रांतिकारक क्षणाला चालना दिली.

 

सिरोंचा पथकाचे नेतृत्व

कटमक सुदर्शन हे 1981 ला आदिलाबाद जिल्हा समितीचे सचिव होते. नंतर 1985 मध्ये गुरिल्ला झोन पर्स्पेक्टिव्हचा भाग म्हणून दंडकारण्य प्रदेशात गेले. सुदर्शनने गडचिरोलीतील सिरोंचा पथकाचे नेतृत्व केले. जे दंडकारण्याला पाठवलेल्या सात पथकांपैकी एक होते. गडचिरोली (महाराष्ट्रातील) ते छत्तीसगडमधील बस्तरपर्यंत विस्तारले होते.

त्यानंतर, सुदर्शन यांनी आदिलाबाद, गडचिरोली, बस्तर ते पूर्व गोदावरीपर्यंत विस्तारित रिट्रीट झोन तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तत्कालीन सीपीआय-एमएल पीपल्स वॉरचे ते वन संपर्क समिती सदस्य होते.

पॉलिट ब्युरोचे सदस्य

सुदर्शन यांची 1995 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या उत्तर तेलंगणा स्पेशल झोनल कमिटी (NTSZC) चे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1995 मध्ये ऑल इंडिया स्पेशल कॉन्फरन्समध्ये त्यांची केंद्रीय समितीवर निवड झाली. तसेच 2001 आणि 2007 काँग्रेसमध्ये त्यांची केंद्रीय समिती आणि पॉलिट ब्युरोचे सदस्य म्हणून निवड झाली.

सुदर्शन यांनी भारतातील क्रांतिकारक क्षण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सुमारे पाच दशकांच्या भूमिगत जीवनात सुरक्षेसह डझनभर गोळीबारातून ते बचावले. छत्तीसगडच्या दंडकारण्यमध्ये भूमिगत असताना कटकम सुदर्शन यांचा ३१ मे रोजी मृत्यू झाला, असे माओवादी पक्षाने रविवारी प्रसिद्धीपत्रकात जाहीर केले.