Nanded | पुराच्या पाण्यात जिपसह वाहून जाणाऱ्या जिप चालकाला वाचवण्यात पोलिसांना यश, व्हिडीओ व्हायरल…

| Updated on: Aug 05, 2022 | 11:46 AM

पुराचे पाणी वाढल्याने अशोक तुळशीराम राठोड जिपसह पुराच्या पाण्यात बुडाले. मात्र, ते जीव वाचवत जिपच्या टपावर जाऊन बसले. स्थानिक नागरिक आणि मुक्रामाबाद पोलिसांनी दोरखंडाच्या सहाय्याने अशोक राठोड यांना सुखरुप बाहेर काढले.

Nanded | पुराच्या पाण्यात जिपसह वाहून जाणाऱ्या जिप चालकाला वाचवण्यात पोलिसांना यश, व्हिडीओ व्हायरल...
Follow us on

नांदेड : संपूर्ण नांदेड (Nanded) जिल्हात जोरदार पाऊस कोसळतोयं. यामुळे नद्यांना पूर आल्याने अनेक रस्ते बंद करण्यात आलेत. इतकेच नाही तर नांदेड शहराच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून लोकांच्या घरात देखील पाणी (Water) शिरले आहे. हिंगोली नाका येथील रेल्वेचा भुयारी पुल देखील वाहतूकीसाठी सध्या बंद करण्यात आलायं. नायगावच्या अनेक गावांचा संपर्क देखील तुटलायं. शेताला नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एकंदरीतच काय तर संपूर्ण नांदेड जिल्हात पावसाने हाहा:कार केलायं. नांदेड जिल्हातील मुखेड तालुक्यात एक जीप पुराच्या पाण्यात (Flood water) वाहून जातानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं.

नांदेड जिल्हात पुराच्या पाण्यात जिपसह चालक अडकला

नांदेड जिल्हात पुराच्या पाण्यात जिपसह वाहून जाणाऱ्या जिप चालकाला वाचवण्यात पोलिसांना आणि स्थानिक नागरिकांना यश आले. अशोक तुळशीराम राठोड असं वाचविण्यात आलेल्या जीप चालकाचे नाव आहे. खेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील जामडोह येथील ओढ्याला आलेल्या पुरात अशोक राठोड हे काल रात्री साडेआठच्या सुमारास जिपसह वाहून जात होते.

हे सुद्धा वाचा

पोलिस आणि ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करत चालकाचा जीव वाचवला

पुराचे पाणी वाढल्याने अशोक तुळशीराम राठोड जिपसह पुराच्या पाण्यात बुडाले. मात्र, ते जीव वाचवत जिपच्या टपावर जाऊन बसले. स्थानिक नागरिक आणि मुक्रामाबाद पोलिसांनी दोरखंडाच्या सहाय्याने अशोक राठोड यांना सुखरुप बाहेर काढले. एसडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले होते. मात्र, टीम येण्यापूर्वीच अशोक यांना पुरातून बाहेर काढण्यात आले. मात्र, हा जीप पुराच्या पाण्यात वाहून जातानाचा आणि अशोक हे जीपवर बसल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.