VIDEO : चंद्रपूर जिल्हातील भटाळी गावामध्ये वाघाचे रौद्र रूप, वाघ आणि गावकरी एकमेकांसमोर, पाहा थरारक व्हिडीओ!

| Updated on: Dec 23, 2021 | 11:39 AM

चंद्रपूर जिल्हातील अनेक भागांमध्ये वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. भटाळी गावामध्ये तर एक खतरनाक घटना घडली आहे. भटाळी गावामध्ये वाघ आणि गावकरी एकमेकांसमोर आले. त्याचे झाले असे की, इरई नदी शेजारी वाघाने एका गाईची शिकार केली.

VIDEO : चंद्रपूर जिल्हातील भटाळी गावामध्ये वाघाचे रौद्र रूप, वाघ आणि गावकरी एकमेकांसमोर, पाहा थरारक व्हिडीओ!
गावकरी आणि वाघ एकमेकांसमोर
Follow us on

मुंबई : चंद्रपूर जिल्हातील (Chandrapur) अनेक भागांमध्ये वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. भटाळी गावामध्ये तर एक खतरनाक घटना घडली आहे. भटाळी गावामध्ये वाघ (Tiger) आणि गावकरी एकमेकांसमोर आले. त्याचे झाले असे की, इरई नदी शेजारी वाघाने एका गाईची शिकार केली. याची कुणकुण गावामध्ये लागली आणि गावकरी घटनास्थळी आले आणि त्या वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होते.

अख्य गाव एकीकडे आणि एकटा वाघ

यावेळी गावकऱ्यांना पाहून वाघ अधिकच चवताळला. वाघाचे हे रूद्ररूप पाहून गावकऱ्यांनी मात्र, काढता पाय घेतला. गाईची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाला लोकांनी हाकलून लावले. मात्र काहीच वेळात हा वाघ शिकार केलेल्या गाईवर ताव मारण्याकरिता परत घटनास्थळाकडे लोकांच्या दिशेने सरसावला. हे बघून लोकांची भंबेरी उडाली. अखेर लोकांनाच वाघाला पाहून पळ काढावा लागला. ही घटना भटाळी गावालगत घडली.

भटाळी गावाजवळील इरई नदीलगत पट्टेदार वाघाने एका गाईची शिकार केली. गुराख्याने आरडाओरड करून वाघाला कसेबसे पळवून लावले. ही माहीती गावामध्ये मिळताच गावकऱ्यांसोबत गायमालक घटनास्थळी आले. त्या ठिकाणी लोकांची एकच गर्दी झाली होती. पट्टेदार वाघ समोरून घटनास्थळावर जमलेल्या लोकांच्या दिशेने येत होता.

वाघाचे रूप पाहून गावकऱ्याचा काढता पाय 

घाबरगुंडी उडालेल्या लोकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाघ दूर जागीच बसला. वाघाने केलेल्या शिकारीवर ताव मारण्याच्या ठिकाणी लोकांची गर्दी बघून वाघ अधिकच खवळला. वाघाची आक्रमकता बघून गावकऱ्यांनी वेळ वाया न घालता घटनास्थळावरून पळ काढला. या वाघाचा परिसरात मोठा वावर आहे. या घटनेमुळे भटाळी गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात वाघांच्या घटना वाढल्या आहेत.

संबंधित बातम्या : 

पुण्यात धावत्या बाईकवर बिबट्याचा हल्ला, नवऱ्याची शिताफी, दाम्पत्य थोडक्यात बचावलं

खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी वर्तमानपत्र वापरता येणार नाही, अन्न आणि औषध प्रशासनाचे नवे आदेश काय? वाचा सविस्तर