Pune Metro | 6 मार्चला मेट्रो मार्गिकेचं PM Modi करणार उद्धाटन

| Updated on: Mar 02, 2022 | 3:52 PM

पुणे मेट्रोच्या (Pune metro) वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. या 31.25 किलोमीटर मार्गिकेवरील 12 किलोमीटरची कामे पूर्ण झाली असून हा मार्ग प्रवाशांना खुला करण्यासाठी तयार आहे.

Follow us on
पुणे मेट्रोच्या (Pune metro) वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. या 31.25 किलोमीटर मार्गिकेवरील 12 किलोमीटरची कामे पूर्ण झाली असून हा मार्ग प्रवाशांना खुला करण्यासाठी तयार आहे. तर उर्वरित अंतरावरील कामे अंतिम टप्प्यात असून तो मार्गदेखील लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. वनाज ते रामवाडी हे 14.66 किलोमीटर तर पिंपरी चिंचवड ते स्वारगेट ही 16.59 किलोमीटरची मार्गिका असून त्यामध्ये 14 स्थानके आहेत. 6 मार्चला या मेट्रो मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते उद्घाटन होणार आहे. पुणे मेट्रोची पहिली झलक Exclusive  टीव्ही 9 वर ड्रोन (Drown) दृश्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून पुणेकर मेट्रोची वाट पाहत होते. आता त्यांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.