Nashik| नाशिकमध्ये 6 नगरपंचायतींसाठी उद्या मतदान, प्रशासन सज्ज; चोख पोलीस बंदोबस्त

| Updated on: Dec 20, 2021 | 1:19 PM

नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीमध्ये 87 जागांसाठी एकूण 292 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार दिले आहेत.

Nashik| नाशिकमध्ये 6 नगरपंचायतींसाठी उद्या मतदान, प्रशासन सज्ज; चोख पोलीस बंदोबस्त
election
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील निफाड, पेठ, सुरगाणा, देवळा, दिंडोरी आणि कळवण या 6 नगरपंचातींसाठी उद्या मंगळवारी मतदान होत आहे. निवडणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकूण 87 जागांसाठी 292 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार दिले आहेत. सुरगाणा आणि पेठ नगरपंचायतीमध्ये ओबीसी आरक्षण नाही. त्यामुळे येथे सर्वच्या सर्व 17 जागांवर निवडणूक होत आहे. निफाड आणि दिंडोरी नगरपंचायतीत 14 जागांवर मतदान होणारय. देवळा येथे फक्त 11 जागांवर मतदान होणारय. या ठिकाणी 5 जागा ओबीसीसाठी राखीव होत्या. या निवडणुकीत एकूण 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात देवळा येथील दोन आणि दिंडोरी, कळवण नगरपंचायतीतील एकेका उमेदवाराचा समावेश आहे.

निफाडः 27 मतदान केंद्र

निफाडमध्ये 27 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. येथे 32 केंद्राध्यक्षांची नियुक्ती केली आहे. 160 कर्मचारी आणि 96 अधिकारी आहेत. तर मतदान यंत्रांची संख्या 32 आहे. मतदानासाठी 32 पथके असून, प्रत्येक मतदान केंद्रावर एक पथक असेल. तर पाच पथक राखीव आहेत. या निवडणुकीसाटी 8662 पुरुष मतदार आणि 8511 स्त्री मतदान असे एकूण 17 हजार 174 मतदान मतदानाचा हक्क बजावतील.

देवळाः 33 उमेदवार रिंगणात

देवळा येथे 11 मतदान केंद्रावर मतदान होईल. येथे 33 उमेदवार रिंगणात आहेत. 11 मतदान केंद्राध्यक्षांसह 33 मतदान अधिकारी आणि 66 मतदान कर्मचाऱ्यांची नियु्क्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी 15 मतदान यंत्र असणार आहेत. देवळात चार ओबीसी जागा राखीव होत्या. येथे 18 जानेवारी मतदान होईल.

कळवणः 15 हजार 403 मतदार

कळवण येथे 14 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात आहेत. येथे 14 मतदान केंद्रावर मतदान होईल. 19 मतदान यंत्र त्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी 42 अधिकाऱ्यांसह 85 कर्मचारी, 2 झोन ऑफिसर, 14 केंद्राध्यक्ष काम पाहणार आहेत. या ठिकाणी 15 हजार 403 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दिंडोरीः एक जण बिनविरोध

दिंडोरी येथे 14 जागांवर निवडणूक होत आहे. त्यासाठी 19 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. निवडणुकासाठी 19 मतदान केंद्राध्यक्ष, 57 मतदान अधिकारी, 95 कर्मचारी आणि 23 मतदान यंत्रांची सोय करण्यात आली आहे. दिंडोरीत 14 हजार 717 मतदान मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे सुजित मुरुकुटे बिनविरोध निवडून आले आहेत.

पेठः 29 मतदान यंत्र

पेठ नगरपंचायतीमध्ये 17 मतदान केंद्रांवर मतदान होईल. त्यासाठी 2 झोनल ऑफिसर, 21 मतदान केंद्राध्यक्ष, 66 मतदान अधिकारी, 21 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथे 29 मतदान यंत्रावर मतदान होईल.

सुरगाणाः 64 उमेदवारांमध्ये लढत

सुरगाणा नगरपंचायतीसाठी 17 जागांवर 64 उमेदवारांमध्ये लढत होत आहे. येथे एकूण 4212 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. येथे 17 मतदान केंद्रावर मतदान होईल. त्यासाठी 17 मतदान केंद्राध्यक्ष, 51 मतदान अधिकारी, 34 मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर 30 मतदान यंत्र ठेवण्यात आली आहेत.

इतर बातम्याः

Omicron| नाशिकमध्ये अजून एका कोरोना रुग्णाचा मृत्यू, 446 जणांवर उपचार सुरू, 341 संशयितांचे अहवाल प्रतिक्षेत

Nashik| ठंडा ठंडा कूल कूल…नाशिकमध्ये थंडीची लाट, निफाडचा पारा 8.5 अंशावर; उत्तरेच्या वाऱ्याने आणले जेरीस!