जो तडीपार होईल तो उद्या मंत्री होईल… ठाकरे गटाच्या आंदोलनात नेत्यांनी शिंदे गटावर केला हल्लाबोल…

| Updated on: Oct 19, 2022 | 2:43 PM

मुख्यमंत्री यांना तडीपार करा मी तुम्हाला प्रमोशन देतो असे म्हणत अरविंद सावंत यांनी एका पोलीस अधिकाऱ्यांना आवाहन केले आहे.

जो तडीपार होईल तो उद्या मंत्री होईल... ठाकरे गटाच्या आंदोलनात नेत्यांनी शिंदे गटावर केला हल्लाबोल...
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) काही नेत्यांना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्याने ठाकरे गटाकडून सरकारसह पोलीसांच्या ( Police) विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. खासदार राजन विचारे यांच्या उपस्थित हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यात ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत, अरविंद सावंत, भास्कर जाधव आणि ठाकरे गटाचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी भाजपसह शिंदे गटावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी जहरी टीका केली आहे. सरकार बदलताच ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होऊ लागल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकणाथ शिंदे यांच्यावर 100 गुन्हे असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले होते असे म्हणत ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांच्यावर पोलीस का कारवाई करत नाही असे म्हणत शिंदेंना लक्ष केले आहे. याशिवाय देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील गुन्हे दाखल असून ते तडीपार असल्याचा आरोप करत यावेळी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री यांना तडीपार करा मी तुम्हाला प्रमोशन देतो असे म्हणत अरविंद सावंत यांनी एका पोलीस अधिकाऱ्यांना आवाहन केले आहे.

नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल करत स्वाभिमानी पक्षावरुण खिल्ली उडवली आहे. स्वाभिमान काढून गहाण ठेवला आहे असे म्हणत राणें कुटुंबावर अरविंद सावंत यांनी टीका केली.

केंद्रीय मंत्री अमित शाह हे तडीपार मंत्री आहेत, त्यामुळे भास्कर जाधव तुम्हाला पुढील काळात चांगले दिवस आहे, तुमच्यावर तडीपारीची नोटिस काढली आहे.

तर आमदार भास्कर जाधव यांना एसीबीने नोटिस बजावल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे. पोलिसांकडून अन्याय होत आहे म्हणून मोर्चा काढल्याचे जाधव यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल कायम शंका घेतात पण त्यांनी संयमाने चांगले काम केले आहे, त्यांच्यावर कुणीही शंका घेण्याचे काम नाही असेही भास्कर जाधव म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना आता नवी संधी दिली आहे, जे काय व्हायचे आहे ते होईल होऊन जाउद्या आम्ही सगळे तुमच्या सोबत असल्याचे भास्कर जाधव म्हणाले आहे.

मात्र आमच्यावर इन्कम टॅक्स, एसीबीची नोटिस, तडीपारीची नोटीसा बजावली आहे. अनेकांना जेलमध्ये पाठवल्याची तयारी सुर असल्याचे जाधव म्हणाले.

विनायक राऊत यांनीही गद्दारी करणारे आमच्या भाषणाने मलिन होतात असा टोला लगावला. पोलीसांनी आदेश पाळले पाहिजे पण नियम पाळून काम केले पाहिजे.

शंभर गुन्हे दाखल असलेल्या मुख्यमंत्री यांच्यावर कारवाई केली जात नाही, शिंदे यांची सुपारी घेऊन आम्हाला संपवून टाकण्याचे काम करू नाक, पोलीसांच्या नोटिसा आम्हाला पाचविला पूजलेली आहे.

एकूणच पोलीसांच्या विरोधात मोर्चा काढत शिंदे सरकार आणि पोलिसांवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.