भीमाशंकरच्या दानोबा मंदिरात रात्रभर सोंगट्यांचा खेळ, जाणून घ्या ऐतिहासिक महत्त्व

| Updated on: Oct 13, 2021 | 8:09 AM

नवरात्र उत्सवात भिमाशंकरच्या डेहेणेत दानोबा मंदिरात रात्रभर तल्लीन होऊनसोंगट्यांचा खेळ रंगला. हा खेळ खेळण्यासाठी गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपत भिमाशंकर परिसराच्या विविध गावातून ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांचा मोठा सहभाग होता.

1 / 5

2 / 5
या खेळात पराभव झाल्यानंतर पराभव झालेल्यांना मध्यरात्रीच पवित्र भीमानदीत स्नान घातले जाते. बुद्धीमत्तेच्या या खेळाला कौरव-पांडवांचा खेळ म्हणूनही एक वेगळी ओळख आहे.

3 / 5
महाभारतात हा खेळ खेळल्याचे सर्वश्रुत आहे. याच खेळात कौरवांसोबत पांडव हरल्याने पांडवांना १२ वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात काढावे लागले होते.

4 / 5
फक्त नवरात्र उत्सवाच्या कालावधीतच हा खेळ खेळला जातो. भगवान शंकर- पार्वतीच्या आवडीचा हा खेळ होता. महादेवाच्या मल्हार अवतारात हा खेळ खेळला गेला.

5 / 5
खेळासाठी कापडी सारीपाट वापरला जातो. लाकडी सोंगट्यांचा वापर होतो. लाकडी सोंगट्या कापडी पटावर ठेऊन हा खेळ सुरु होतो. तर फासे म्हणून कवड्यांचा वापर केला जातो. ज्या प्रमाणे खेळाडू कवड्याचे दान घेतो त्या दानानुसार सोंगटी पटावर पुढे चालवली जाते.