पुणे: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) अरुण राठोड (Arun Rathod )याला पुणे पोलिसांनी (Pune Police) चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी तपासादरम्यान कमालीची गुप्तता पाळली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या त्यामध्ये अरुण राठोडचा उल्लेख आहे. अरुण राठोडला ताब्यात घेतल्यानं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गुंता सुटण्याची शक्यता आहे. (Pune Police detained Arun Rathod for investigation of Pooja Chavan Suicide case Sanjay Rathod live updates)
भंडारा : मनमोहन सिंह सरकारच्या काळात सिनेअभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते, मात्र आता त्यांना देखील विसर पडल्याने, भविष्यात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, तसेच चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
अरुण राठोड याची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी पूजा चव्हाणची चुलत आजी चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केली आहे. विलास चव्हाण याला ही ताब्यात घेण्यात यावं, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
पुणे पोलिसांना चौकशी करण्यास सांगण्यात आलंय. सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. कुणाला ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती आहे. आम्ही पोलिसांना फोन करत नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अरुण राठोड याला ताब्यात घेतल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर दिलं आहे.
अरुण राठोड याच्या चौकशीबाबात पुणे पोलिसांकडून कमालीची गुपत्ता पाळण्यात येत आहे. अरुण राठोडला ताब्यात घेण्यात आलं असून पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशी करण्यात येणार आहे.