पिंपरी चिंचवड महापालिकेवर आजपासून प्रशासक; महापौर माई ढोरे शासकीय वाहन जमा करत दुचाकीवरून परतल्या घरी

| Updated on: Mar 14, 2022 | 10:32 AM

राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसाठी प्रारूप प्रभागरचना, त्यावरील हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करत अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याची तयारी केली होती. मात्र असे असतानाच राज्य सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुरुस्ती विधेयक संमत केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेवर आजपासून प्रशासक; महापौर माई ढोरे शासकीय वाहन जमा करत दुचाकीवरून परतल्या घरी
mayor Mai Dhore traval on Two wheeler
Follow us on

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यानंतर महापालिका पदाधिकारी त्यांची वाहने जमा करतात. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये महापौर (mayor) पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे महापौर माई ढोरे यांनी आपले शासकीय वाहन जमा केले. महापालिकेत महापौरपदाचे वाहन जमा केल्यानंतर त्यांनी दुचाकीवरून आपल्या घरी गेल्या. पिंपरी चिंचवड महापालिका सभागृहाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आजपासून महापालिकेचा कारभार प्रशासक पाहणार आहे. आयुक्त राजेश पाटील (Commissioner Rajesh Patil)प्रशासक म्हणून आता पालिकेचे प्रमुख असणार आहेत. महानगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ 13 तारखेला संपुष्टात आला असून आता प्रत्येकजण निवडणूक लागणार कधी याची वाट पाहत आहे.

निवडणूक आयोगाची वेट अँड वॉचची भूमिका

पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी महिन्यामध्ये होणे अपेक्षित होते. मात्र ओबीसी आरक्षणाचा पेच आणि प्रभागरचनेची लांबलेली प्रक्रिया यामुळे निवडणूक पुढे गेली. त्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये निवडणूक होणार होती. मात्र ओबीसींशिवाय निवडणूका होऊ नयेत ही भूमिका सरकारसह विरोधकांनीही घेतली. दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसाठी प्रारूप प्रभागरचना, त्यावरील हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करत अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याची तयारी केली होती. मात्र असे असतानाच राज्य सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुरुस्ती विधेयक संमत केले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत हे विधेयक एकमताने मंजूर झाले. त्यामुळे आयोगाने आता अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याऐवजी वेट अँड वॉचची भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे.

पुणे महापालिकेवर उद्यापासू प्रशासक

पुणे महानगरपालिकेचाही पाच वर्षाचा कालावधीही संपुष्टात आला आहे. उद्यापासून पुणे महापालिकेचा प्रशासक म्हणून आयुक्त विक्रमकुमार कारभार पाहणार आहे. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी चार मार्चला दिलेल्या आदेशानुसार महापालिकेवर प्रशासक नेमला जाणारा आहे. पुणे म्हणपालिकेवर प्रशासक नेमला जाण्याची ही दुसरीच घटना आहे. यापूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पुणे महापालिकेतील सर्व सदस्यांनी राजीनामे दिले होते. त्यावेळी पहिल्यादा पालिकेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करावी लागली होती.

Pomegranate Garden : कीड-रोगाने डाळिंब बागांना घेरले, आता कृषी विभागाच्या मोहीमेने मिळणार का नवसंजीवनी!

विकेंडला रात्री जेवायला गेले, घरात सव्वा लाखांच्या ऐवजावर डल्ला, औरंगाबादेतली घटना!

‘चाचा ओss चाचा…’ हे आजोबा भलतेच जोशात आलेत, बहुतेक 50 वर्षानंतर भेटले असावेत! Funny video viral