पुण्यात दुहेरी हत्याकांड, जादूटोण्याचा संशय

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील औंढे येथे जादूटोणा करत असल्याच्या संशयावरुन दुहेरी हत्याकांड झाल्याची खळबळजनक घटना पाडव्याच्या दिवशी घडली. दिवाळी सणादरम्यान दोघांची धारदार शस्त्राने हे दुहेरी हत्याकांड झाल्याने परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आता तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु […]

पुण्यात दुहेरी हत्याकांड, जादूटोण्याचा संशय
Follow us on

रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील औंढे येथे जादूटोणा करत असल्याच्या संशयावरुन दुहेरी हत्याकांड झाल्याची खळबळजनक घटना पाडव्याच्या दिवशी घडली. दिवाळी सणादरम्यान दोघांची धारदार शस्त्राने हे दुहेरी हत्याकांड झाल्याने परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आता तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

नावसू कुणाजी वाघमारे (वय 55 वर्षे) आणि लिलाबाई सुदाम मुकणे (वय 48 वर्षे) अशी हत्या झालेल्या दोघांची नाव आहेत. हे दोघे जादूटोणा करत असल्याचा संशय काहीजणांना होता. त्यावरुनच त्यांची हत्या झाली असावी असा अंदाज खेड पोलिसांनी वर्तवला आहे.

या हत्याकांड प्रकरणी कोहिंडे या शेजारील गावातील काही जणांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्यांची पोलिस सखोल चौकशी करत आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास पुणे ग्रामीण पोलिस करत आहेत.

दरम्यान, दुहेरी हत्याकांड झाल्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासाबाबतच्या सूचना संबधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. यासंदर्भात पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता नावसू कुणाजी वाघमारे आणि लिलाबाई सुदाम मुकणे धारदार हत्याराने वार करुन त्यांची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.