वसंत मोरे यांना राष्ट्रवादीची ऑफर, ४०० पदाधिकाऱ्यांचा मनसेला रामराम

| Updated on: Dec 05, 2022 | 11:07 PM

वसंतराव मला भेटायचं तुम्हाला, असंही अजित पवार मला म्हणाल्याच वसंत मोरे यांनी सांगितलं.

वसंत मोरे यांना राष्ट्रवादीची ऑफर, ४०० पदाधिकाऱ्यांचा मनसेला रामराम
वसंत मोरे
Follow us on

पुणे : वसंत मोरे राष्ट्रवादी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. एक पदाधिकाऱ्याच्या हकालपट्टीनंतर ४०० कार्यकर्त्यांनी मनसेला रामराम ठोकलाय. पुण्यात मनसेच्या फुटीची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांना वसंत मोरे यांच्यासमोर हात पुढं केला. अरे अजून किती दिवस नाराज राहणार. ये आम्ही तुझी वाट पाहतोय, असं अजित पवार म्हणाल्याचं वसंत मोरे म्हणाले. एका लग्नसोहळ्यात वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली.

वसंतराव मला भेटायचं तुम्हाला, असंही अजित पवार मला म्हणाल्याच वसंत मोरे यांनी सांगितलं. पुण्यात मनसेत काही गटतट पडले. याची माहिती त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिली. पण, त्यावर कोणत्याही प्रकारची अक्शन घेतली गेली नसल्याचं वसंत मोरे यांचं म्हणणंय.

वसंत मोरे तक्रार घेऊन मुंबईत गेले. राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना आपल्या गाडीत बसविले. तक्रार ऐकूणही घेतली. पण, तरीही सारं काही आलबेल नसल्याचं वसंत मोरे यांच्या बोलण्यातून दिसतं.

पक्षातले विषय बाहेर बोलायचं नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळं पक्षातील नाराजी राज ठाकरे यांच्याकडं बोलल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं. पक्षातले काही लोकं असं का करतात. व्यक्त कुणाकडं व्हायचं, असा सवाल वसंत मोरे यांनी विचारलाय. मनसेनं काल माथाडी कामगार पुणे जिल्हाध्यक्ष निलेश माझरे यांची हकालपट्टी केली. त्यानंतर जवळपास ४०० सदस्यांनी मनसेला रामराम ठोकलाय.

पुणे मनसेचं कधीकाळी तीन प्रमुख चेहरे होते. पहिले वसंत मोरे, दुसऱ्या रुपाली पाटील आणि साईनाथ बाबर. यापैकी रुपाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या. वसंत मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा आहे. साईनाथ बाबर यांना मनसेनं शहर अध्यक्ष केलंय.