पुण्यात पाणीकपातीच्या प्रश्नावरुन हटके पोस्टरबाजी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

पुणे : पुण्यात सध्या पाण्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. पाणीकपातीमुळे पुणेकरांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. या प्रकरणावर लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे म्हणून पुणेकरांनी हटके पोस्टर्स शहरभर लावले आहेत. या पोस्टरवरील वाक्य सगळ्यांच्याच चर्चेचचा विषय ठरले आहेत. पुण्यात अघोषित पाणीकपात ? “गल्ली ते दिल्ली तुमचा थाट, शंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट” अशा आशयाचे पोस्टर्स पुण्यात […]

पुण्यात पाणीकपातीच्या प्रश्नावरुन हटके पोस्टरबाजी
Follow us on

पुणे : पुण्यात सध्या पाण्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. पाणीकपातीमुळे पुणेकरांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. या प्रकरणावर लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे म्हणून पुणेकरांनी हटके पोस्टर्स शहरभर लावले आहेत. या पोस्टरवरील वाक्य सगळ्यांच्याच चर्चेचचा विषय ठरले आहेत.

पुण्यात अघोषित पाणीकपात ?

“गल्ली ते दिल्ली तुमचा थाट, शंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट” अशा आशयाचे पोस्टर्स पुण्यात लावण्यात आले आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.

हे पोस्टर्स नेमके कुणी लावले, हे अद्याप कळू शकले नाही. मात्र, या पोस्टरखाली ‘तुमच्या कारभाराला कंटाळलेले पुणेकर’ असे छापण्यात आले आहे.