एका मांजरीनं पिंपरी-चिंचवड शहराला दिला 100 कोटींचा दणका! नेमकं काय घडलं?

| Updated on: Mar 23, 2022 | 7:01 PM

पिंपरी चिंचवडमधील महापारेषणच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये सकाळी मांजर घुसलं. त्यामुळे शहरातील बत्ती गुल झाली. विजेच्या जोरदार धक्क्याने मांजरीच्या जागीच मृत्यू झाला. पण आकुर्डी, भोसरी शहर, भोसरी एमआयडीसी भागातील तब्बल 60 हजार ग्राहकांना याचा मोठा फटका बसल्याची माहिती माहापारेषणच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.

एका मांजरीनं पिंपरी-चिंचवड शहराला दिला 100 कोटींचा दणका! नेमकं काय घडलं?
वीजपुरवठा
Image Credit source: TV9
Follow us on

पिंपरी-चिंचवड : महापारेषणच्या उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळं भोसरी (Bhosari) आणि आकुर्डीतील (Aakurdi) तब्बल 60 हजार घरांची बत्ती गुल झाली. अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रातील 100 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास बिघाड झाला होता. त्यामुळे भोसरी, आकुर्डीमधील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांसह सुमारे साठ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद (Power Off) पडला होता. मात्र ही बत्ती गुल का झाली? याचं कारण आता समोर आलंय. एका मांजरीमुळे पिंपरी-चिंचवडला (Pimpri Chinchwad) जवळपास 100 कोटींचा फटका बसलाय!

त्याचं झालं असं की, पिंपरी चिंचवडमधील महापारेषणच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये सकाळी मांजर घुसलं. त्यामुळे शहरातील बत्ती गुल झाली. विजेच्या जोरदार धक्क्याने मांजरीच्या जागीच मृत्यू झाला. पण आकुर्डी, भोसरी शहर, भोसरी एमआयडीसी भागातील तब्बल 60 हजार ग्राहकांना याचा मोठा फटका बसल्याची माहिती माहापारेषणच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. दरम्यान, औद्योगिक वसाहतीतील वीजपुरवठा 12 – 12 तास शेड्यूल करण्यात आलाय. तर रहिवासी भागातील काही ठिकाणचा वीजपुरवठा सुरु झाला असून काही भागातील वीज सुरळीत होण्यास अजून काही कालावधी लागणार असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.

एकूण 10 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद

दरम्यान, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीमधील गवळी माथा येथे महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रामध्ये 100 एमव्हीए क्षमतेचे दोन व 75 एमव्हीए क्षमतेचा एक असे एकूण तीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. मात्र त्यातील 100 एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. उर्वरित दोन ट्रान्सफॉर्मरद्वारे महावितरणच्या एकूण 26 वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र यातील 100 एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या एकूण 10 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला.

कोणत्या भागातील बत्ती गुल?

पिंपरीतील प्रामुख्याने भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर तसेच नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील 4500 औद्योगिक ग्राहकांसह सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सद्यस्थितीत बंद आहे. महावितरणकडून याबाबत संबंधित सर्व ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली होती.

इतर बातम्या :

Pune : छतावरच्या 30 फुटी टॉवरवर अडकली होती मांजर, अनोखी शक्कल लढवत अग्निशामक दलानं केली सुटका; पाहा Video

PMC | पुणे महापालिकेचा कार्यकाल संपला, तरी स्थायी समिती बरखास्त होत नाही ; स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने याचा आक्षेप