पुणे येथील उच्चशिक्षित २०० तरुणांना ३०० कोटींचा गंडा, पोलीस आयुक्तालयासमोरच कार्यालय उघडून फसवणूक

| Updated on: Mar 19, 2023 | 10:35 AM

पुणे शहरात कर्ज टॉपअप करण्याच्या नावाखाली २०० युवकांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक तब्बल ३०० कोटींमध्ये आहे. एकाच वेळी अनेक बँकांमधून कर्ज घेऊन फसवणूक झाली आहे. कर्ज मिळवून देणाऱ्या चोरट्याने कर्जाचे पैसे आपल्या कंपनीत गुंतवण्यास लावले होते.

पुणे येथील उच्चशिक्षित २०० तरुणांना ३०० कोटींचा गंडा, पोलीस आयुक्तालयासमोरच कार्यालय उघडून फसवणूक
दुकानाचे शटर तोडून मोबाईलची चोरी
Follow us on

पुणे : उच्चशिक्षित तरुणांची फसवणूक करण्याचा नवा प्रकार पुणे शहरातून उघड झाला आहे. हे तरुण बेरोजगार नव्हते, त्यांनी नोकरीसाठी पैसे दिले नव्हते, तर चांगल्या आयटी कंपन्यांमध्ये (Pune IT City) हे तरुण नोकरीला होते. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात थकलेले कर्ज फेडण्यासाठी कर्ज टॉपअप केले. परंतु कर्ज टॉपअप करणाऱ्याने एकाच वेळी अनेक बँकांमधून त्यांच्या नावावर कर्ज घेतले गेले. २०० तरुणांची या पद्धतीने फसवणूक झाली. कर्ज मिळवून देणाऱ्या चोरट्याने या लोकांना कर्जाचे पैसे आपल्या कंपनीत गुंतवण्यास लावले. मग कंपनी बंद करुन तो पसार झाला. या प्रकरणात २०० जणांची ३०० कोटी रुपयांमध्ये फसवणूक झाली आहे.

काय आहे प्रकार


पुणे येथील कोंढवा परिसरात राहणारा सेलवा नडार याने अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट नावाने कंपनी सुरु केले. कोरोना काळात असलेल्या लॉकडाऊनच्या काळात कोणाकोणाची कर्ज थकली त्याची माहिती त्याने डेटा व्हेंडरकडून मिळवली. मग या माहितीचा उपयोग करत त्याने आपल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. या कर्मचाऱ्यांनी अनेकांना संपर्क करुन तुमचे कर्ज टॉपअ‍ॅप करुन देतो, असे त्याने सांगितले.

हे सुद्धा वाचा

तुमचे कर्ज मी घेतो. त्यासाठी त्यांच्याकडून आणखी ३ बँकांचे कर्जासाठी केवायसी घेतले. या तरुणांच्या नावावर एकावेळी तीन तीन बँकांकडून कर्ज काढले. ते काढताना त्यांचे जुने कर्ज फेडले. त्यामुळे त्यांचे सिबील क्लीन झाल्याने त्यांना कर्ज मिळाले.

पोलीस आयुक्तालयासमोर सुरु होती फसवणूक


पोलीस आयुक्तालयासमोरील न्युक्लेअस मॉलमधील अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटमध्ये ऑगस्ट २०२० ते नोव्हेबर २०२२ दरम्यान हा प्रकार सुरु होता. तरुणांना मिळालेले कर्जाचे पैसे नडार याने त्याच्या अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेवी स्वरुपात ठेवण्यास सांगितले. त्या ठेवीमधून चांगला परतावा मिळत असल्याने अनेक जण आमिषाला बळी पडले. मग या तरुणांना त्यांचा कर्जाचा हप्ता भरण्यास दर महिन्याला रक्कम दिली जात होती.

परंतु नोव्हेंबर २०२२ पासून कर्जाच्या हप्त्याची रक्कम देणे बंद झाले. दोन तीन महिने काही कारणे देत रक्कम देत नव्हता. अचानक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी कार्यालय बंद करुन पळून गेला. त्यानंतर या गुंतवणुकदाराने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी लोहगावमधील एका ३८ वर्षाच्या तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.

उच्चशिक्षित तरुणा आमिषाला बळी पडत असल्याचे उदाहरण आहे. विशेष म्हणजे हे तरुण आयटी कंपन्यांमध्ये नोकरीला होते.