सिरींज अभावी लसीकरणला ब्रेक,चौफेर टीकेनंतर पुणे महापालिकेला जाग, 1 लाख सिरींजची खरेदी

| Updated on: Oct 01, 2021 | 11:30 AM

कोरोना लसीकरण सिरींज अभावी रखडल्याचा प्रकार पुण्यात घडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली होती. सिरींज अभावी लसीकरण थांबल्यानं पुणे महापालिकेवर टीकेची झोड उठली होती. अखेर पुणे महापालिकेनं 1 लाख सिरींज खरेदी केल्या आहेत, अशी माहिती लसीकरण प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे.

सिरींज अभावी लसीकरणला ब्रेक,चौफेर टीकेनंतर पुणे महापालिकेला जाग, 1 लाख सिरींजची खरेदी
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us on

पुणे : कोरोना लसीकरण सिरींज अभावी रखडल्याचा प्रकार पुण्यात घडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्यातील मोठ्या महानगरपालिकांपैकी एक महापालिका असणाऱ्या अ दर्जाच्या पुणे महापालिकेकडे 1.50 रुपयांची सिरींज नसावी यापेक्षा दुर्दैव काय असावं ?, असा सवाल प्रशांत जगताप यांनी केला होता. सिरींज अभावी लसीकरण थांबल्यानं पुणे महापालिकेवर टीकेची झोड उठली होती. अखेर पुणे महापालिकेनं 1 लाख सिरींज खरेदी केल्या आहेत, अशी माहिती लसीकरण प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे.

सिरींज अभावी लसीकरणाला ब्रेक

पुण्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत सिरींजचा तुटवडा असल्यानं कोरोना लसीकरणाला ब्रेक लागला होता. सिरींज अभावी लसीकरण थांबवण्याची नामुष्की पुणे महापालिकेवर आली होती. विरोधकांनी टीका केल्यानंतर अखेर पुणे महानगरपालिकेने कोरोना लसीकरणासाठी 1लाख सिरींज खरेदी केल्या आहेत. मुबलक लस उपलब्ध असूनही केवळ सिरींज नसल्याने लसीकरणाला ब्रेक लागला होता. महानगरपालिकेने 3 लाख रुपये खर्च करून 1 लाख सिरींजची खरेदी केलीय त्यामुळे आजपासून महानगरपालिका हद्दीतील सर्व केंद्रांवर लसीकरण सुरळीत होईल, अशी माहिती लसीकरण प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे.

सिरींज अभावी लसीकरण बंद पडणं शोभतं का? राष्ट्रवादीचा सवाल

राज्यातील मोठ्या महानगरपालिकांपैकी एक महापालिका असणाऱ्या अ दर्जाच्या पुणे महापालिकेकडे 1.50 रुपयांची सिरींज नसावी यापेक्षा दुर्दैव काय असावं ?, असा सवाल प्रशांत जगताप यांनी केला होता. पुणे अ दर्जाची महापालिका, जिचं बजेट 8 हजार कोटी आहे,भौगोलिकदृष्ट्या महापालिका मोठी आहे, आज तिच्याकडे सिरींज नसावी. त्या अभावी लसीकरण बंद पडणं निश्चित पुण्यातील सत्ताधाऱ्यांना शोभणारं नाही. पालिकेत सत्ताधारी असणाऱ्या महापौर, चेअरमन, आणि सभागृह नेत्यांना याची कल्पना नव्हती का ?, असा सवाल जगताप यांनी केला होता.

पुणे महापालिकेकडे 1.50 रुपयांची सिरींज नसणं दुर्दैव, सत्ताधाऱ्यांचा भोंगळ कारभार सुरु, प्रशांत जगताप यांचा आरोप

सत्ताधारी भाजपनं कोणतंच चांगलं कामं केलं नाही

पुण्यातील सत्ताधारी भाजपनं गेल्या साडे चार वर्षात कोणतंही चांगलं काम केलंलं नाही. येत्या काळात पुणेकर यांना चांगली सुबुद्धी देतील, असं प्रशांत जगताप म्हणाले आहेत. आतापर्यंत कोणतचं चांगलं काम यांनी केलेलं नाही. पुणेकर यांना चार महिन्यात बदलून दाखवतील, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. पुण्यातील सत्ताधारी भाजपकडून सगळा भोंगळ कारभार सुरु आहे. आम्ही पुण्यात सेल्फी विथ खड्डे ही स्पर्धा घेतली होती. ही बाब पुणेकरांना कळू नये म्हणून घाई घाईनं खड्डे बूजवायला सुरुवात केली. शहरात सगळीकडे यांच दुर्लक्ष आहे अ दर्जाच्या महापालिकेचा सगळा भोंगळ कारभार चाललाय,असा आरोप जगताप यांनी केला होता.

इतर बातम्या:

वाशिमच्या ग्रामपंचायतींनी 107 कोटींचं वीज बिल थकवलं, महावितरणकडून कनेक्शन कट मोहिम, पाणी पुरवठा योजना संकटात

आई राजा उदो उदो: नवरात्रोत्सवात वणीचे सप्तश्रृंगी मंदिर 24 तास सुरू; यात्रा रद्द, दर्शनासाठी कडक नियम

 

Pune Municipal Corporation buy one lakh syringe after criticism of NCP and other leaders