राज्यात 22 ते 27 जूनदरम्यान शंभर टक्के पाऊस, अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज

| Updated on: Jun 18, 2019 | 5:15 PM

चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. कारण मान्सून 20 तारखेला म्हणजे दोन दिवसात सक्रीय होण्याचा अंदाज आहे.

राज्यात 22 ते 27 जूनदरम्यान शंभर टक्के पाऊस, अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज
Follow us on

पुणे : चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. कारण मान्सून 20 तारखेला म्हणजे दोन दिवसात सक्रीय होण्याचा अंदाज आहे. पश्चिम बंगाल आणि अरबी समुद्रात मान्सून वीस-एकवीस तारखेनंतर अधिक सक्रिय होईल अशी माहिती हवामान आणि वायू प्रदूषण निरीक्षण प्रमुखडॉ.अनुपम काश्यपी यांनी दिली.

महत्त्वाचं म्हणजे 22 ते 27 जून म्हणजेच पाच दिवसात राज्यात तब्बल शंभर टक्के पाऊस पडेल. विशेषत: पुण्यात या पाच-सहा दिवसात चांगला पाऊस पडेल. धरणातील पाणी साठा वाढू शकतो, असाही अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्र विदर्भासह राज्यातील अनेक ठिकाणी  23 तारखेपर्यंत पाऊस पडण्याचे संकेत आहेत. 24 तारखेपर्यंत विदर्भ मराठवाड्यासह सर्वत्र जोरदार पाऊस होईल. तर पंचवीस तारखेला तर राज्यात सर्वत्रच मान्सून बरसेल, असाही अंदाज आहे.  कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पाऊस बरसणार आहे. इतकंच नाही तर कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून, विदर्भातही अतिवृष्टीचे संकेत आहेत.

संबंधित बातम्या 

मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी, कल्याण-डोंबिवली येथे जोरदार पाऊस  

पाऊस आल्यावर लाईट का जाते आणि महावितरणला कसं समजतं?