भारत जोडो यात्रा का?; राहुल गांधींनी एकाच वाक्यात उत्तर दिलं…

| Updated on: Nov 09, 2022 | 8:04 PM

आम्हाला नागरिकांच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत त्यासाठी आम्ही लोकांना भेटत आहोत असं राहुल गांधींनी सांगितले.

भारत जोडो यात्रा का?; राहुल गांधींनी एकाच वाक्यात उत्तर दिलं...
Follow us on

मुंबईः काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक नेते आता राहुल गांधी यांच्याबरोबर भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांबरोबर बोलताना भारत  जोडो यात्रेचा हेतूही सांगितला. राहुल गांधी यांनी बोलताना म्हणाले की, भारत बघायचा असले तर रस्त्यावर जाण्याची गरज आहे. विमान आणि हेलिकॉप्टरमधूम भारत कळणार नाही असंही त्यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेतून आम्ही नागरिकांबरोबर संवाद साधत असून लोकांच्या आम्ही रस्त्याने चालून लोकांच्या मनातला भावना ऐकून घेतो. लोकांच्या भावना ऐकून घेत असल्याने आम्ही जास्त बोलत नाही, आम्ही लोकांचं ऐकून घेतो असंही त्यांनी स्पष्ट केले.

भारत जोडो यात्रेनिमित्त राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील अनेक नागरिकांबरोबर संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी नागरिकांच्या समस्या, महागाई, बेरोजगारी आणि इतर समस्याही त्यांनी जाणून घेतल्या.

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी या यात्रेचा हेतू सांगताना ते म्हणाले की, आम्हाला नागरिकांच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत. त्याबरोबरच राज्यातील अनेक प्रोजेक्ट हे गुजरातमध्ये जात आहेत. ते जाण्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे गुजरातच्या निवडणुकांसाठी हे प्रोजेक्ट गुजरातमध्ये घेऊन जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशात जे प्रकल्प आणि उद्योग राबवले जात आहेत. ते प्रकल्प आणि उद्योग फक्त देशातील काही मोजक्या उद्योगपतींना दिले जात असल्याचे सांगत त्यांनी केंद्रावर जोरदार टीकाही केली.

राहुल गांधी यांनी नोटबंदीविषयी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी यांनी जी नोटबंदी केली होती, ती एक प्रकरची त्यांची व्यूहरचनाच होती. त्यामुळे देशातील छोट्या उद्योजकांना मोठा फटका बसला असल्याचेही त्यांनी सांगितले.

ईडीविषयी बोलतानाही त्यांनी केंद्रावर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, मी सीडी ईडीला घाबरत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एकीकडे चीन आक्रमण करत आहे पण त्याविषयी कोणीही बोलत नाही. त्याविषयी केंद्र सरकार कोणतीही भूमिका मांडत नाही.

तर दुसरीकडे लोकांचा रोजगारही गायब झाला आहे. तर महागाईचा फटकाही जनसामान्य लोकांना बसला आहे. सध्या गॅस सिलिंडर बाराशे रुपयाने झाला आहे मात्र त्याविषयही पंतप्रधाना नरेंद्र मोदी काही बोलत नाही असा जोरदार टोला त्यांनी केंद्रावर लगावला आहे.