महाराष्ट्रात ‘या’ रोगाचा धोका वाढला, 6 जिल्ह्यात 1 कोटींहून अधिक गोळ्यावाटप, आरोग्यमंत्र्यांचेही निर्देश

| Updated on: Jul 01, 2021 | 7:37 PM

महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड आणि यवतमाळ या 6 जिल्ह्यांमध्ये एका वेगळ्याच आजारामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. त्याच्या निर्मुलनासाठी थेट राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच निर्देश दिलेत.

महाराष्ट्रात या रोगाचा धोका वाढला, 6 जिल्ह्यात 1 कोटींहून अधिक गोळ्यावाटप, आरोग्यमंत्र्यांचेही निर्देश
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us on

मुंबई : राज्यात हत्तीरोग (Filariasis) निर्मूलनासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम पंधरवडा 15 जुलैपर्यंत राबवण्यात येणार आहे. यासाठी 6 जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड आणि यवतमाळचा समावेश आहे. या मोहिमेची सुरुवात आज (1 जुलै) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाली. यावेळी राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातून हत्तीरोग निर्मूलनासाठी यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन केले (Rajesh Tope instruct health department to eradicate Filariasis from Maharashtra).

राज्यातील 18 जिल्हे हत्तीरोग प्रवण जिल्हे म्हणून ओळखले जायचे. त्यापैकी जळगाव, सिंधुदुर्ग, लातूर, अकोला, नंदुरबार, सोलापूर, उस्मानाबाद, अमरावती, ठाणे, पालघर, नागपूर आणि वर्धा या 12 जिल्ह्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम यशस्वीपणे राबविल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आता ही मोहिम बंद करण्यात आली आहे. सध्या उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये ही मोहीम आजपासून 15 जुलैपर्यंत राबविली जाणार आहे.

6 जिल्ह्यांमध्ये 1 कोटी 3 लाख लोकांना हत्तीरोग विरोधी गोळ्या वाटप

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड व यवतमाळ या 6 जिल्ह्यांमध्ये 8098 गावांमधील 1 कोटी 3 लाख लोकांना हत्तीरोग विरोधी गोळ्या सेवन करण्यासाठीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या सहाही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय समितीच्या सभा घेण्यात आल्यात. नागरीकांना गोळ्या वाटपासाठी 41 हजार 352 कर्मचारी व 4135 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन मिशन मोडवर ही मोहीम यशस्वी करावी, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं.

दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेचा ऑनलाईन शुभारंभ प्रसंगी आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुक्त डॉ.रामास्वामी, संचालक डॉ.अर्चना पवार यांच्यासह सहाही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक उपस्थित होते.

हेही वाचा :

‘तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, तुमच्या कार्याला सलाम’, आरोग्यमंत्री टोपेंचं राज्यातल्या डॉक्टरांना भावनिक तितकंच कणखर पत्र

लसीकरण या एकाच मंत्राने तिसरी लाट थोपवता येईल, आरोग्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन

आता कॅन्सरग्रस्तांना मुंबईला जायची गरज नाही, जालन्यातच होणार उपचार, राजेश टोपेंच्या हस्ते पीएसए प्रकल्पाचा शुभारंभ

व्हिडीओ पाहा :

Rajesh Tope instruct health department to eradicate Filariasis from Maharashtra