शिंदे गटाचं ठरलं ! “हिंदू गर्व गर्जना” शिवसेना संपर्क यात्रेला सुरुवात

| Updated on: Sep 24, 2022 | 8:02 PM

दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी नाशिकमधील लक्ष्मी लॉन्स येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक गटाचा मेळावा पार पडला.

शिंदे गटाचं ठरलं ! हिंदू गर्व गर्जना शिवसेना संपर्क यात्रेला सुरुवात
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाचा दसरा मेळावा हा बीकेसी (BKC Ground) येथील मैदानावर होणार हे जवळपास निश्चित मानला जात आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून जास्तीत जास्त संख्येने दसरा मेळाव्याला उपस्थिती शिवसैनिकांनी लावावी यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू आहे. आज नाशिकमध्ये (Nashik) शिंदे गटाच्या मंत्री, आमदार आणि खासदार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याबरोबरच कुणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी होते. हे दाखवून देऊ असाही उल्लेख यावेळी भाषण करतांना आमदार, खासदार यांनी केला आहे. या मेळाव्या दरम्यान लावण्यात आलेल्या फलकावर ‘शिवसेना संपर्क यात्रा हिंदू गर्व गर्जना’ असा उल्लेख करण्यात आलेला आहे.

दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी नाशिकमधील लक्ष्मी लॉन्स येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक गटाचा मेळावा पार पडला.

मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून ‘शिवसेना संपर्क यात्रा हिंदू गर्व गर्जना’ घोषणा देण्यात आल्या याशिवाय फलक देखील लावण्यात आला होता.

मेळाव्याला गौण खनिज मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, उपनेत्या शीतल म्हात्रे, सचिव संजय म्हैसकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बी के सी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला नाशिक जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मेळाव्यात करण्यात आले.

यावेळी भाषणादरम्यान आमदार सुहास कांदे यांनी शिवसेना का सोडली याचाही उल्लेख करत आपल्या दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी झाली पाहिजे असे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी हे ठिकठिकाणी मेळावे घेऊन बीकेसीवरील मैदानावर शिंदे यांची ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे.