शिंदे गटाचा परभणीत राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न? आता थेट आमदारच आपल्या पक्षात येणार असल्याचा दावा

| Updated on: Jan 25, 2023 | 4:29 PM

परभणीत (Parbhani) नुकतंच महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) 84 सरपंचांनी शिंदे गटात (Shinde group) प्रवेश केल्याची बातमी ताजी असताना आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.

शिंदे गटाचा परभणीत राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न? आता थेट आमदारच आपल्या पक्षात येणार असल्याचा दावा
Image Credit source: Google
Follow us on

परभणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाची महाराष्ट्रात घोडदौड सुरुच आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे पाठोपाठ आता परभणीतही पक्षबांधणीत शिंदे गट अव्वल ठरत असल्याचं बघायला मिळत आहे. परभणीत (Parbhani) नुकतंच महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) 84 सरपंचांनी शिंदे गटात (Shinde group) प्रवेश केल्याची बातमी ताजी असताना आता आणखी एक बातमी समोर आलीय. परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते, आमदार बाबाजानी दुर्रानी (Babajani Durrani) हे शिंदे गटात येण्यासाठी इच्छूक असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते सईद खान यांनी केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सईद खान यांचे हे आरोप बाबाजानी यांनी फेटाळले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांना फोन करुन याविषयी चर्चा केलीय आणि सईद खान यांना चुकीची माहिती न पसरवण्याचं सांगण्याचं आवाहन केलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबाजानी दुर्रानी हे शिंदे गटात येण्यासाठी इच्छूक असल्याचा दावा सईद खान यांनी केलाय. याशिवाय दुर्रानी यांनी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरांची भेट घेतलीय, असाही दावा सईद खान यांनी केलाय. पण त्यांचे हे आरोप बाबाजानी दुर्रानी यांनी फेटाळले आहेत. “मी खोतकरांना भेटलेलो नाही. सईद खान खोटं बोलत आहेत”, असं स्पष्टीकरण दुर्रानी यांनी दिलंय.

हे सुद्धा वाचा

ऑडिओ क्लिप व्हायरल

विशेष म्हणजे अर्जुन खोतकर आणि बाबाजानी दुर्रानी यांच्यातील फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आलीय. अर्थात ‘टीव्ही 9 मराठी’ या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. पण या ऑडिओमधून दुर्रानी यांनी आपण शिंदे गटात जाणार नसून आपण अर्जुन खोतकरांना त्याविषयी काही बोललेलो नाही, असं स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

संबंधित ऑडिओ क्लिपमधील व्यक्ती आधी स्व:ची ओळख बाबाजानी दुर्रानी यांचा पीए असल्याची ओळख सांगते. त्यानंतर बाबाजानी दुर्रानी यांना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्याशी बोलायची इच्छा असल्याचं म्हणते. त्यानंतर बाबाजानी दुर्रानी आणि अर्जुन खोतकर यांच्यात संभाषण सुरु होतं, असा दावा करण्यात आलाय.

नेमकं संभाषण काय?

अर्जुन खोतकर : हॅलो
बाबाजानी : बाबाजानी बोल रहा हँ साहेब
अर्जुन खोतकर : अरे, बोल-बोल, नमस्कार!
बाबाजानी : अरे मला यायचं होतं. ते गब्बरने 19 तारखेला तुम्हाला भेटायला येणार असल्याचं म्हटलं आहे.
अर्जुन खोतकर : नाही, नाही. काही संबंध नाही. तुम्ही आलेसुद्धा नाहीत. भेटलेही नाहीत. मी त्याला बोललो की बाबाजानी : मला फोन आला होता. पण ते त्याबद्दल काही बोलले सुद्धा नाहीत.
अर्जुन खोतकर : मी बोललो की त्यांच्यासोबत माजी भेटही झाली नाही.
बाबाजानी : तेच म्हणतोय, असं कस होत आहे?
अर्जुन खोतकर : नाही, नाही. आपली भेट होऊन वर्ष उलटलं असेल.
अर्जुन खोतकर :नाही त्यांनी चुकीचं म्हटलं आहे. मी त्यांना जाहीरपणे बोलेन.
बाबाजानी : हा तुम्ही त्यांना जाहीरपणे बोला की, अशाप्रकारे चुकीची माहिती पसरवू नये
अर्जुन खोतकर : नक्की बोलेन. प्रेसवाल्याला माझ्याकडे पाठवून द्या. मी बोलतो.
हा बोलून द्या.
अर्जुन खोतकर : बाबाजानी आणि माझी काही भेट झालेली नाही. ती बातमी चुकीची आहे. माझ्यासमोर कोणताही प्रस्ताव नव्हता, असं मी बोलेन
बाबाजानी : हा, बिल्कुल