‘सबका मालिक एक’ म्हणणाऱ्या साईंच्या शिर्डीतही भगवीकरणाचा घाट?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी : साई बाबांच्या शिर्डीत वेगळाच वाद समोर आलाय. शिर्डीत साईबाबा संस्थानवर भाजपशी निगडीत विश्वस्त मंडळ असल्याने शिर्डीची वाटचाल भगवीकरणाकडे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. ग्रामस्थांनी आज साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांना निवेदन देत हे भगवीकरण थांबवण्याची मागणी केली आहे. तर हा वाद निरर्थक होता, असं स्पष्टीकरण […]

सबका मालिक एक म्हणणाऱ्या साईंच्या शिर्डीतही भगवीकरणाचा घाट?
Follow us on

मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी : साई बाबांच्या शिर्डीत वेगळाच वाद समोर आलाय. शिर्डीत साईबाबा संस्थानवर भाजपशी निगडीत विश्वस्त मंडळ असल्याने शिर्डीची वाटचाल भगवीकरणाकडे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. ग्रामस्थांनी आज साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांना निवेदन देत हे भगवीकरण थांबवण्याची मागणी केली आहे. तर हा वाद निरर्थक होता, असं स्पष्टीकरण साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी दिलंय.

काही दिवसात मंदिर परिसर बदलत आहे. ठिकठिकाणचे दिशा दर्शक फलक हे भगवे झाले आहेत, तर द्वारकामाई, जिला अगोदर मस्जिद म्हटलं जायचं आणि तसा नावाचा उल्लेख असलेला फलक असायचा, तेथील बोर्डावरही आता द्वाराकामाई मंदिर असा उल्लेख आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या सर्व आरोपांमुळे ‘सबका मालिक एक’ या संदेशाला तडा जात असल्याचं शिर्डीकर म्हणत आहेत.

साई समाधी शताब्दी ध्वजारोहनावर देखील ओम आणि त्रिशुल उभारला गेला, तो ध्वजही भगवाच होता. या एवजी सर्वधर्म समभाव यातून दिसायला हवा होता असंही शिर्डीतील मुस्लीम साईभक्त म्हणतात.

भाजपशी निगडीत विश्वस्त मंडळ नेमण्यात आल्यानंतरच शिर्डीचं भगवीकरण होऊ लागल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. मंदिर परिसरातील छोटी मंदिरे, महत्त्वाची ठिकाणे अधोरेखित करणारे फलक, दिशा दर्शक फलक, देणगी काउंटर, संस्थानचे सूचना फलक हे सर्वच भगवे झाले आहेत, तर संस्थानकडून प्रकाशित होणारे विविध धार्मिक पुस्तकं आणि ग्रंथावर ‘सबका मालिक एक’ ऐवजी ओम साईनाथाय नम: असं छापण्यात येत असल्याने शिर्डीचं भगवीकरण होत असल्याचा संशय ग्रामस्थ घेत आहेत. शिर्डी साई गेजेटीअर अनटोल्ड स्टोरीजचे लेखक प्रमोद आहेर यांनी हा आरोप केलाय.

या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांना ग्रामस्थांनी एक निवेदन दिलंय. हे भगवीकरण थांबवावं, द्वाराकामाई समोर अगोदर प्रमाणे मोठ्या अक्षरात मस्जिद असा उल्लेख करावा, अशी मागणी केली आहे. या संदर्भात अग्रवाल यांनी संस्थानचा असा काहीही मानस नसल्याचं स्पष्ट करत, शताब्दी असल्याने हे नवे फलक लावण्यात आले होते, द्वारकामाई नावासमोर मोठ्या अक्षरात मस्जिद असं नाव लावण्यासाठी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन ग्रामस्थांना दिलंय.

“क्या मंदिर, क्या मस्जिद, रोम रोम में है ईश्वर अल्ला” या उक्तीप्रमाणे शिर्डीच्या साईबाबांनी अवघ्या जगाला सबका मालिक एक आणि सर्व धर्म समभाव अशी शिकवण दिली. या पावननगरीतच असा वाद निर्माण झाल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.