Samruddhi Mahamarg देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी एकनाथ शिंदेनी मुहूर्त शोधला; शिर्डी-नागपूर समृद्धी मार्ग 15 ऑगस्टपासून सुरु होणार

| Updated on: Jul 18, 2022 | 9:12 PM

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी एकनाथ शिंदेनी मुहूर्त शोधला आहे. समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते नागपूर(Shirdi-Nagpur Samriddhi Marg) हा टप्पा 15 ऑगस्टपासून वाहतूकीसाठी खुला होणार आहे. अनेक वेळा याच्या शुभारंभाचा मुहूर्त टळला होता. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. राज्यातील महत्वाचा महामार्ग ठरणाऱ्या समृद्धी महामार्ग वाहनांसाठी कधी सुरू होणार, […]

Samruddhi Mahamarg देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी एकनाथ शिंदेनी मुहूर्त शोधला; शिर्डी-नागपूर समृद्धी मार्ग 15 ऑगस्टपासून सुरु होणार
समृद्धी महामार्ग
Follow us on

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी एकनाथ शिंदेनी मुहूर्त शोधला आहे. समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते नागपूर(Shirdi-Nagpur Samriddhi Marg) हा टप्पा 15 ऑगस्टपासून वाहतूकीसाठी खुला होणार आहे. अनेक वेळा याच्या शुभारंभाचा मुहूर्त टळला होता. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. राज्यातील महत्वाचा महामार्ग ठरणाऱ्या समृद्धी महामार्ग वाहनांसाठी कधी सुरू होणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.

शिर्डी आणि नागपूर दरम्यानचा 520 किमीचा मार्ग प्रथम खुला केला जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिली आहे. आतापर्यंत या मार्गाचे काम 95% पूर्ण झाले आहे. एमएसआरडीसीनुसार मुंबई आणि नागपूर दरम्यानच्या संपूर्ण 701 किमी कॉरिडॉरचे काम 85% पूर्ण झाले आहे आणि हा मार्ग 2023 पर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने यावर्षी 2 मे रोजी शेलू बाजार वाशीम ते नागपूर दरम्यान किमान 210 किमीचा पट्टा सुरू करण्याची योजना आखली होती. मात्र, वन्यजीव ओव्हरपासच्या कमानाची रचना कोसळल्याने ही योजना पुढे ढकलण्यात आली. या दुर्घटनेत एका मजुराचाही मृत्यू झाला होता.

तीन भागात विभाजन

समृद्धी महामार्गाचे तीन भाग करण्यात आले आहेत. भाग 1 मध्ये, शिर्डी ते नागपूर दरम्यानचा 520 किमीचा रस्ता खुला केला जाणार आहे. भाग 2 मध्ये, अतिरिक्त 103 किमीचा रस्ता खुला केला जाईल ज्यामुळे इगतपुरी आणि नागपूर दरम्यान 623 किमीचा महामार्ग वाहतुकीच्या कक्षेत येईल आणि भाग 3 मध्ये, 2023 पर्यंत संपूर्ण 701 किमीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

कोणत्या जिल्ह्यांना जोडणार समृद्धी मार्ग?

नागपूर ते मुंबई असे 700 किलोमीटरचे अंतर ताशी 150 किमी वेगाने पार करण्याची क्षमता असलेला महामार्ग महाराष्ट्र सरकार विकसित करत आहेत. यालाच बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे म्हटले जाते. हा मार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई या 12 जिल्ह्यांना जोडणार आहे. या जलद मार्गाचा फायदा चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड यांनाही अप्रत्यक्षपणे होणार आहे. म्हणजेच जवळपास 26 तालुके व 392 गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे.

औरंगाबादमध्ये कसा आहे मार्ग?

नागपूर ते मुंबई अशा 700 किमी अंतरापैकी हा रस्ता औरंगाबाद जिल्ह्यातून 112 किमी लांबीचा असेल.
त्याची रुंदी 120 मीटर रुंदीची असून तो 6 पदरी असेल.
जिल्ह्यातील औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर या तीन तालुक्यांतील 71 गावांमधून समृद्धी महामार्ग गेला आहे.
पोखरी शिवारात 290 मीटर लांबीचा बोगदा अंतिम टप्प्यात आहे. सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव, जांबरदाव या 5 ठिकाणी इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात आहे.