आषाढी यात्रेत पांडुरंगाच्या चरणी भरभरुन दान; श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला मिळाली पाच कोटी सत्तर लाख रुपयांची देणगी

| Updated on: Jul 18, 2022 | 3:31 PM

यंदा पायी पालखी दिंडी आषाढी सोहळा साजरा झाला. त्यामुळे गेल दोन वर्षे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला मुकलेले लाखो भाविक यात्रेसाठी पंढरपूरात दाखल झाले होते. भाविकांच्या उपस्थितीने पंढरपूरनगरी गजबजून गेली होता. आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी देवाच्या चरणी भरभरुन दान दिल्याने तिजोरी तुडुंब भरली आहे.

आषाढी यात्रेत पांडुरंगाच्या चरणी भरभरुन दान; श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला मिळाली पाच कोटी सत्तर लाख रुपयांची देणगी
Follow us on

पंढरपूर : कोरोनानंतर प्रथमच मोठ्या उत्साहात आणि निर्बंधाशिवाय आषाढी यात्रा(aashadhi Ekadashi 2022) पार पडली. या यात्रेला राज्यभरातील भाविकांनी लाखोच्या संख्येने हजेरी लावली((Pandharpur Wari)). पंढरपूर नगरी टाळ आणि मृदुंगाच्या गजराने दुमदुमून निघाली यावेळेस. भक्तांचा उत्साह काही वेगळाच होता. विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी पांडुरंगाच्या चरणी भरभरून दान देखील केले आहे. यंदाच्या आषाढी यात्रेदरम्यान च्या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला(Shree Vitthal Rukmini Temple Committee) मिळाली पाच कोटी सत्तर लाख रुपयांची देणगी मिळाली आहे. यासह भाविकांनी मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिनेही विठूरायाला अपर्ण केले आहेत.

यंदा पायी पालखी दिंडी आषाढी सोहळा साजरा झाला. त्यामुळे गेल दोन वर्षे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला मुकलेले लाखो भाविक यात्रेसाठी पंढरपूरात दाखल झाले होते. भाविकांच्या उपस्थितीने पंढरपूरनगरी गजबजून गेली होता. आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी देवाच्या चरणी भरभरुन दान दिल्याने तिजोरी तुडुंब भरली आहे.

आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला मिळाले पाच कोटी सत्तर लाख रुपयांची देणगी मिळाली आहे. देवाच्या चरणावर, देणगी पावती, सोने चांदीचे दागिने तसेच भक्त निवास, लाडु विक्रीच्या माध्यमातून भरघोस दान मिळाले आहे. श्री विठ्ठलाच्या देणगीत भरीव वाढ झाल्याचेस चित्र यंदा पहायला मिळाले.

2019 मध्ये पार पडलेल्या आषाढी यात्रेमध्ये विठ्ठल मंदिर समितीला 4 कोटी 40 लाख रुपयांची देणगी मिळाली होती. यावर्षी विठ्ठलाला सोने आणि चांदीचे दागिने ही मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दान केले आहेत.

विठ्ठल रुक्मिणीला एक कोटी रुपयाचा सोन्याचा मुकुट!

यंदाच्या आषाढी यात्रेत श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला अडीच किलो वजनाचे एक कोटी रुपयाचे सोन्याचे मुकुट भेट म्हणून देण्यात आले. आषाढी एकादशीच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील भाविक विजयकुमार उत्तरवार श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेला सोन्याचे मुकुट भेट म्हणून दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हा कार्यक्रम पार पडला. विजयकुमार उत्तरवार उमरी येथील सोन्या चांदीचे व्यापारी आहेत. आर्य वैश्य कोमटि समाजाच्या वतीने उत्तरवार यांचा सत्कार देखील करण्यात आला .

महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेस यांच्या हस्ते झाली विठ्ठलाची महापूजा

यंदा 10 जुलैला आषाढी एकादशी सोहळा पार पडला.  20 जूनला देहू मधून संत तुकाराम महाराजांची आणि 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघाली. यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी झाल्या होत्या. वारी करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल झाली.  यंदा महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा झाली.