माध्यान्ह भोजनात विद्यार्थ्याच्या ताटात खिचडीऐवजी साप

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील शाळेच्या खिचडीत चक्क साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. हदगाव तालुक्यातील गारगव्हाण इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत बुधवारी हा धक्कादायक प्रकार घडला. सुदैवाने मुलांना खिचडी देण्यापूर्वीच त्यामध्ये साप असल्याचं आढळल्याने अनर्थ टळला. एका शिक्षकाने मुलांना खिचडी देण्यापूर्वी ती तपासून पाहताना त्यामध्ये साप शिजल्याचं दिसून आलं. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे एका विद्यार्थ्याच्याच ताटात […]

माध्यान्ह भोजनात विद्यार्थ्याच्या ताटात खिचडीऐवजी साप
Follow us on

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील शाळेच्या खिचडीत चक्क साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. हदगाव तालुक्यातील गारगव्हाण इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत बुधवारी हा धक्कादायक प्रकार घडला. सुदैवाने मुलांना खिचडी देण्यापूर्वीच त्यामध्ये साप असल्याचं आढळल्याने अनर्थ टळला. एका शिक्षकाने मुलांना खिचडी देण्यापूर्वी ती तपासून पाहताना त्यामध्ये साप शिजल्याचं दिसून आलं. या प्रकाराने एकच खळबळ उडाली.

धक्कादायक म्हणजे एका विद्यार्थ्याच्याच ताटात खिचडी वाढत असताना हा साप अढळला. त्यामुळे अर्थातच खिचडी वाटप थांबवण्यात आलं.  कोणत्याही विद्यार्थ्यांना ही खिचडी खाऊ न दिल्याने, मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, या प्रकारानंतर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच नांदेड शिक्षण विभागाचे पथक शाळेत दाखल झाले. याप्रकाराबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये माध्यान्ह भोजन दिलं जातं. मात्र या माध्यान्ह भोजनामुळे अनेक शाळांमध्ये विषबाधेच्या घटना समोर आल्या आहेत. नांदेडमध्ये खिचडीत चक्क साप सापडल्याने माध्यान्ह भोजनावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

माध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेबाबत सुरुवातीपासूनच शंका उपस्थित केली जाते. हे अन्नपदार्थ शिजवण्यापूर्वी जिथे ठेवलं जातं, तिथली स्थिती, त्याला लागलेल्या मुंग्या, घुशी किंवा अन्य घाण या सर्व पार्श्वभूमीवर माध्यान्ह भोजन खरंच विद्यार्थ्यांसाठी पोषक ठरतं का हा खरा प्रश्न आहे.