मुंबई : 2018 सालाला बाय बाय केल्यानंतर आजपासून नवीन वर्ष सुरू झालं आहे. काल अनेकांनी 2018 वर्षातील अखेरच्या सूर्यास्ताचे दृश्य शेअर केली होती. 2019 या नव्या वर्षातील पहिल्या दिवसाच्या सूर्योदयाचे काही फोटो आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद आणि वाशिममधील हे फोटो आहेत. तांबडं फुटून सूर्यनारायण हळूहळू वर येत असल्याचे मनमोहक असे सुंदर फोटो आहेत. या उगवत्या सूर्याचं दर्शन घेऊन नव्या वर्षात नवीन संकल्प घेऊन नागरिक आपली वाटचाल करत असतात.