Special Story | कथा कोरोना योद्ध्यांची, उपेक्षित दूध वितरकांची

| Updated on: Jan 24, 2021 | 8:21 AM

तुम्हाला सुट्टी असो किंवा नसो, थंडी असो किंवा पाऊस असो पण दूध वितरक वर्षांचे संपूर्ण 365 दिवस घराघरात दूध पोहोचवण्याचं काम करतात (Story of Milk Distributor).

Special Story | कथा कोरोना योद्ध्यांची, उपेक्षित दूध वितरकांची
Follow us on

कल्याण (ठाणे) : देशात कोरोनाचा शिरकाव होऊन आता जवळपास दहा महिने होत आली. या दहा महिन्यात भरपूर गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या. कोरोना संसर्ग होऊन नये म्हणून लॉकडाऊन घोषित झाला. त्यानंतर पुढच्या काही टप्प्यात आणखी लॉकडाऊन वाढण्यात आला. नंतर हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. या आठ महिन्यात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार या कोरोना योद्धांनी केलेलं काम कधीही विसरता येणार नाही. आपण बऱ्याचदा त्यांचा अनेकवेळा उल्लेखही करतो. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अर्थात तसं करायलाच हवं. पण हे सर्व करत असताना आपण समाजाच्या एक अविभाज्य घटकाला विसरतोय (Story of Milk Distributor).

या घटकाला तुम्ही, मी, आपण सर्वजण पाहतो. लॉकडाऊन काळात त्यांनीदेखील आपली महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. अनेकांना कोरोनाची लागणही झाली. सर्व काम, घर उघड्यावर पडलं, घरातल्यांनाही कोरोनाची लागण झाली. पण तरीही ते त्यावर मात करुन लढत राहिले. हार मानली नाही. या समाजाच्या घटकाकडे अनेकांचं लक्ष जातं. परंतु, फारसं कुणी त्याचा विचार करत नाही. बघूनही न बघितल्यासारखं होतं किंवा तितकं आपल्या लक्षात येत नाही. हा घटक म्हणजे दूध वितरक! (Story of Milk Distributor)

तुम्हाला सुट्टी असो किंवा नसो, थंडी असो किंवा पाऊस असो पण दूध वितरक वर्षांचे संपूर्ण 365 दिवस घराघरात दूध पोहोचवण्याचं काम करतात. कोरोना संकटात तर दूध वितरकांनाही कोरोनाची लागण झाली. सरकारने कोरोना योद्ध्यांसाठी 50 लाखांचे विमाकवच जाहीर केले. मात्र, दूध वितरकांसाठी काय? असा प्रश्न दूध वितरकांना वाटणं साहजिकच आहे. टीव्ही 9च्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण अशाच काही कोरोना योद्धांची कहानी जाणून घेणार आहोत ज्यांनी या भयावह संकटाला तोंड दिलं आणि त्यातून बाहेर आले.

1) सुरेश पाटील

कल्याणच्या चेतना नाका येथे सुरेश पाटील यांची डेअरी आहे. पाटील जवळपास वीस वर्षांपासून या व्यवसायात आहेत. विशेष म्हणजे सुरेश पाटील दूध वितरणासह समाजकार्यातही सक्रीय आहेत. कोरोना संकटात त्यांनी अनेकांना मदत केली. कोरोना संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी सुरेश पाटील यांनी प्रचंड काळजी घेतली. मात्र, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली. सुरेश पाटील जवळपास 22 दिवस रुग्णालयात अॅडमिट होते. यापैकी 18 दिवस ते ऑक्सिजनवर होते. डॉक्टरांच्या प्रयत्नाने अखेर ते बचावले. सुरेश पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दोन मुली, मुलगा आणि पत्नालाही कोरोनाची लागण झाली होती.

सुरेश पाटील यांच्यावर ओढवलेल्या या संकटाबाबत त्यांचा मुलगा शुभम पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “बाबांना 22 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. ते दिवस फार भयानक होते. रेमडेसिवीरचे सहा इंजेक्शन दिल्यानंतरही त्यांचा ताप उतरत नव्हता. अखेर डॉक्टरांनी एक चाळीस हजाराचं एकमेव इंजेक्शन सांगितलं. त्या इंजेक्शनसाठी आम्ही रात्रभर फिरलो, अखेर एका ठिकाणी ते इंजेक्शन मिळालं. सरकारी सप्सिडीमुळे आधारकार्डवर 31 हजार 500 रुपयात ते इंजेक्शन मिळालं. या भयानक काळात व्यवसायाचं प्रचंड नुकसान झालं. याशिवाय मनस्ताप कित्येक पटीने जास्त झाला”, अशी प्रतिक्रिया शुभम यांनी दिला.

2) आप्पा पाटील

कल्याणच्या चिंचपाडा परिसरात आप्पा पाटील यांची दुधाची डेअरी आहे. पाटील टॅम्पोने दुधाचा सप्लाय करतात. कोरोना काळात त्यांनी आपल्या दोन मुलांच्या मदतीने दूध वितरणाचं काम केलं. तोंडावर मास्क, सॅनिटायझरचा वापर या गोष्टी त्यांनी काटेकोर पाळल्या. मात्र, तरीदेखील त्यांचा घरात कोरोनाचा शिरकाव झाला. आधी लहान मुलाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आप्पा पाटील यांना लागण झालेली. त्यानंतर मोठा मुलगा आणि नंतर पत्नीलाही लागण झाली. कोरोना काळ किती भयावह होता हे त्यांनी प्रचंड जवळून अनुभवलं.

3) भावेश कोळी

कल्याणच्या दूध वितराकांमधील भावेश कोळी हे फार जुने आणि अनुभवी दूध वितरक. सध्या ते अमूल दुधाचे वितरक आहेत. त्यांचं कोळशेवाडीत एक दुकानही आहे. कल्याणमध्ये दूध वितरकांमध्ये सर्वात आधी भावेश यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबालाही बाधा झाली.

आणखी काही स्पेशल रिपोर्ट वाचा :

Special Story | संयमी स्वभाव आणि धडाकेबाज कामगिरी, मराठमोळ्या अधिकाऱ्याची कर्तबगार कहाणी

Special Story | नारपार प्रकल्प : महाराष्ट्राचं पाणी गुजरातला जाणार ही काळ्या दगडावर कोरलेली रेघ

Special story | ‘बचेंगे तो और भी लढेंगे’, पानिपतची लढाई ते शेतकरी आंदोलन, बुराडीचा रक्तरंजित आणि धगधगता इतिहास