वारणानगरमध्ये किसानपुत्र आंदोलनाचे राज्यस्तरीय शिबीर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

कोल्हापूर : किसानपुत्र आंदोलनतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथे राज्यस्तरीय शिबीर आयोजित केलं गेलं आहे. किसानपुत्र आंदोलनाचे हे यंदाचे सहावे राज्यस्तरीय शिबीर असणार आहे. येत्या 5 आणि 6 जानेवारीला वारणानगर येथील ‘शेतकरी संसद’ भवनात हे शिबीर होणार आहे. शिबीरात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. वारणानगरच्या शेतकरी संसद भवनात 5 जानेवारीला सकाळी ठीक 10 […]

वारणानगरमध्ये किसानपुत्र आंदोलनाचे राज्यस्तरीय शिबीर
Follow us on

कोल्हापूर : किसानपुत्र आंदोलनतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथे राज्यस्तरीय शिबीर आयोजित केलं गेलं आहे. किसानपुत्र आंदोलनाचे हे यंदाचे सहावे राज्यस्तरीय शिबीर असणार आहे. येत्या 5 आणि 6 जानेवारीला वारणानगर येथील ‘शेतकरी संसद’ भवनात हे शिबीर होणार आहे. शिबीरात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
वारणानगरच्या शेतकरी संसद भवनात 5 जानेवारीला सकाळी ठीक 10 वाजता वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाचे अध्यक्ष विनय कोरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल. महसूल विभागाचे माजी आयुक्त उमाकांत दांगट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तर किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या अध्यक्षतेखाली शिबीराचे उद्घाटन करतील.
या राज्यस्तरीय शिबिरातील किसानपुत्र आंदोलनामध्ये शेतकरी आत्महत्यांची कारणे आणि त्यावर उपाय, शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे मुद्दे, कमाल शेतजमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा, शेतकरी आणि संविधान या विषयांवर या शिबिरात विचार मंथन केले जाईल.

किसानपुत्र संघटना नव्हे आंदोलन
किसानपुत्र आंदोलन ही कोणतीही संघटना नाही. किसानपुत्र हे एक आंदोलन असून या आंदोलनाच्या माध्यामातून शेतकरीविरोधी कायदे रद्द व्हावेत, यासाठी लढणाऱ्या शेतकाऱ्यांच्या मुला-मुलींचे आंदोलन आहे. मकरंद डोईजड या किसान पुत्राने 31 बी म्हणजेच 9 परिशिष्टच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. हेच किसानपुत्र आता आवश्यक वस्तू कायद्याला आव्हान देण्याची तयारी करीत आहेत.