सांगलीच्या शासकीय रुग्णालयातून रक्ताची पिशवीच चोरीला

| Updated on: Aug 17, 2021 | 9:42 PM

सांगली : शासकीय रुग्णालयातून चक्क रक्ताची पिशवी गायब झाल्याची घटना सांगली जिल्ह्यातील मिरजेत घडली आहे. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात रक्तदात्याने रक्तदान केले, मात्र ‘महिला रुग्णाला’ रक्त चढवण्याच्या अगोदर काही मिनिटात रुग्ण वॉर्डातून रक्ताची पिशवीच गायब झाली. त्यामुळे रक्ताविना महिला रुग्ण वंचित राहिली. नातेवाईकांच्या तक्रारी नुसार या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली असून, या प्रकरणी दोषी आढळणाऱ्यावर […]

सांगलीच्या शासकीय रुग्णालयातून रक्ताची पिशवीच चोरीला
Follow us on

सांगली : शासकीय रुग्णालयातून चक्क रक्ताची पिशवी गायब झाल्याची घटना सांगली जिल्ह्यातील मिरजेत घडली आहे. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात रक्तदात्याने रक्तदान केले, मात्र ‘महिला रुग्णाला’ रक्त चढवण्याच्या अगोदर काही मिनिटात रुग्ण वॉर्डातून रक्ताची पिशवीच गायब झाली. त्यामुळे रक्ताविना महिला रुग्ण वंचित राहिली. नातेवाईकांच्या तक्रारी नुसार या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली असून, या प्रकरणी दोषी आढळणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन रुग्णालय प्रशासनाने दिलंय.
मिरजेच्या शासकीय मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात अश्विनी कांबळे नावाची युवती अशक्तपणामुळे उपचारासाठी 26 नोव्हेबर 2018 ला भरती झाली. त्या अगोदर अश्विनीच्या रक्ताची चाचणी केल्यावर तिला रक्त चढवावे लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यानुसार नातेवाईकांनी तीन रक्तदाते उपलब्ध करून रक्त दिलं. तिघांनी रुग्णालयाच्या रक्त पेढीत रक्तदान केलं. त्यातील योगेश कोळी या रक्तदात्याचं रक्त ओ पॉझिटीव्ह होतं. योगेशसह तिघांना रक्तदान केल्याचं प्रमाणपत्र रुग्णालयाकडून देण्यात आलं.
रुग्णालयातील ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर 27 तारखेला अश्विनी कांबळे भरती असलेल्या रुग्ण वॉर्डात तिला रक्त चढवण्याचं ठरलं. रक्ताची पिशवी सुद्धा तिथे आणण्यात आली. मात्र रक्त चढवण्याच्या आगोदर काही मिनिटात ती रक्ताची पिशवी तेथून गायब झाली. त्यामुळे रक्ताविना अश्विनी कांबळे ही रुग्ण वंचित राहिली. याबाबत नातेवाईकांनी विचारणा केली असता, तेथील डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. तुम्ही रक्तदाते दिले नाहीत, असं संतापजनक उत्तर देण्यात आलं.
तीन रक्तदात्यांनी रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान केलं आणि तिघांना रक्तदान केल्याचं प्रमाणपत्रही मिळालंय. मग रक्तदान केलंच नाही, हा डॉक्टरांचा दावा कुणालाही न पटणारा आहे. रक्ताची पिशवी गहाळ करणाऱ्या मिरजेच्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या विरोधात अश्विनीच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.