रायगड जिल्ह्यातील माणगाव परिसरात संशयास्पद कार आढळल्याने खळबळ

| Updated on: Aug 16, 2022 | 5:51 PM

या कार जवळ कुणीच नसल्याने हा सर्व प्रकार संशयास्पद वाटत आहे. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधत या कारबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहन रेस्क्यू टीम आणि क्रेनच्या साह्याने नदीत अर्धवट बुडालेल्या या कारला बाहेर काढले.

रायगड जिल्ह्यातील माणगाव परिसरात संशयास्पद कार आढळल्याने खळबळ
Follow us on

माणगाव : रायगड जिल्ह्यातील( ​​Raigad district) माणगाव(Mangaon) परिसरात एक संशयास्पद कार(Suspicious car ) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका नदीत ही कार बुडालेल्या अवस्थेत आढळून आली. ही कार दिसताच स्थानिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत या कारला बाहेर काढले आहे. मात्र ही कार नदीत कशी अडकली? या कार मध्ये कोणी होते का? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. पोलिस या सर्व प्रश्ंनांचा शोध घेत आहेत.

नदीत बुडालेल्या अवस्थेत सापडली कार

माणगावमधील चांदोरे गावच्या हद्दीत येणाऱ्या नदीपात्रात ही बेवारस ही कार सापडली आहे. पांढऱ्या रंगाची ही कार आहे. या संशयित कारचा वाहन क्रमांक MH14DF4167 असा आहे. चांदोरे गावच्या हद्दीतील नदीत स्थानिकांना ही पांढऱ्या रंगाची फोर व्हिलर कार अर्धवट बुडलेल्या अवस्थेत आढळली आहे.

क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढली कार

या कार जवळ कुणीच नसल्याने हा सर्व प्रकार संशयास्पद वाटत आहे. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधत या कारबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहन रेस्क्यू टीम आणि क्रेनच्या साह्याने नदीत अर्धवट बुडालेल्या या कारला बाहेर काढले.

या कार जवळ कुणीच नसल्याने हा सर्व प्रकार संशयास्पद वाटतोय

या कार जवळ कुणीच नसल्याने हा सर्व प्रकार संशयास्पद वाटत आहे. पोलिसांनी सदर परिसराच्या आजूबाजूला शोध घेतला असता काहीएक उपयुक्त माहिती व वस्तू सापडलेली नाही. पोलिसांनी ही कार आता माणगाव पोलीस ठाण्याबाहेर उभी केली आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी माणगांव पोलीस करत आहेत.

कारच्या नंबर प्लेट वरून कारच्या मालकाचा शोध घेतला जाणार

कारच्या नंबर प्लेट वरून कारच्या मालकाचा शोध घेतला जात आहे. या कारचा मालक कोण आहे? ही कार नदीत कशी काय बुडाली? ही कार नदीत पडली तेव्हा या कार मध्ये कोणी उपस्थित होते का? उपस्थित असल्यास कार बुडाल्यावर यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला नाही का? अथवा ही कार नदीतच टाकून ते घटनास्थळावरून का निघून गेले असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस तपासाच्या माध्यमातून हे सर्व प्रश्नांची उत्तरं शोधत आहेत.