मुख्यमंत्रीपदासाठी वडिलांचं हिंदुत्त्व गहाण ठेवलं; किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

| Updated on: May 17, 2022 | 8:58 PM

रामाचं दर्शन घेण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. मुख्यमंत्री एका बाजूला आदित्य ठाकरेंना रामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला पाठवत आहेत. तर दुसऱ्या बाजूला भव्य राममंदिर होतं आहे, त्याचं श्रेय घेण्याचे प्रयत्न करत आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्रीपदासाठी वडिलांचं हिंदुत्त्व गहाण ठेवलं; किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
Image Credit source: social media
Follow us on

ठाणे: उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी मुख्यमंत्रीपदासाठी वडिलांचे हिंदुत्व (Hindutva) गहाण ठेवलं असून हे मुख्यमंत्री पूर्णपणे हिरवे झालेले असल्याची बोचरी टीका भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली आहे. आज उल्हासनगरमध्ये भाजपच्या धरणे आंदोलनाला सोमय्या आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. राम हा हिंदुस्थानाचा असा देव आहे, की प्रत्येक जण रामराज्य आणायचा प्रयत्न करतो. पण आमचे उद्धव ठाकरे रामभक्त हनुमान यांची हनुमान चालीसा म्हणणाऱ्याला राजद्रोह म्हणतात आणि राजद्रोहासाठी जेलमध्ये टाकतात, असं किरीट सोमय्या यांनी टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणजे नौटंकी

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारलं असता, अयोध्येला रामाचं दर्शन करण्यासाठी ज्यांना जायचं असेल त्यांना दर्शन करायला मिळालं पाहिजे, असं ते म्हणाले. सोबतच उद्धव ठाकरे म्हणजे नौटंकी असून एका बाजूला एक नेता जातो आहे अयोध्येला, तर मुख्यमंत्र्यांच्या मुलाला पाठवून दिलं अयोध्येला, आणि त्याच वेळी त्याच रामाचा भक्त हनुमानाची हनुमान चालीसा म्हणणाऱ्याला मात्र राजद्रोह म्हणून जेलमध्ये टाकत आहेत अशी टीका सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

श्रेय घेण्याचे प्रयत्न

रामाचं दर्शन घेण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. मुख्यमंत्री एका बाजूला आदित्य ठाकरेंना रामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला पाठवत आहेत. तर दुसऱ्या बाजूला भव्य राममंदिर होतं आहे, त्याचं श्रेय घेण्याचे प्रयत्न करत आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. हे महाशय, ज्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी वडिलांचं हिंदुत्व गहाण ठेवलं, हे मुख्यमंत्री पूर्ण हिरवे झालेले आहेत. यांच्याकडून रामाचं नाव घेणं म्हणजे वा वा वा… अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंनी मीडिया एजन्सीचा सल्ला

बीकेसीमध्ये उद्या होणाऱ्या सभेवरूनही त्यांनी किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी मीडिया एजन्सीचा सल्ला घेतला होता, त्यानुसार वसुली, बेघर लोकांचा प्रश्न, हल्ले यावर उत्तर द्यायला त्यांना स्कोप नाही, त्यामुळे टिझर काढून टाईमपास करून विषयांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीकाही त्यांनी केली. आदित्य ठाकरेंची सात कोटींची चोरी पकडली गेली, रश्मी ठाकरेंच्या 19 बंगल्यांचा घोटाळा बाहेर आला, मेव्हण्याची साडेसहा कोटींची प्रॉपर्टीचा प्रश्न उपस्थित झाला, त्याची उत्तर उद्धव ठाकरेंना द्यायला सांगा, अशी टीकाही किरीट सोमैय्या यांनी केली.