खलाशीच घाबरून घरात बसला तर जहाज पुढे कसं जाईल? मनसे आमदार राजू पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

| Updated on: Sep 06, 2021 | 8:57 PM

अंबरनाथ शहरातल्या नागरी समस्यांच्या संदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांची भेट घेतली. यावेळी शहरातील ओला-सुका कचरा प्रश्न आणि अन्य प्रश्नांबाबत राजू पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच यावर योग्य तो तोडगा काढण्याची मागणी केली.

खलाशीच घाबरून घरात बसला तर जहाज पुढे कसं जाईल? मनसे आमदार राजू पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
मनसे आमदाराची महापालिकेवर जोरदार टीका
Follow us on

अंबरनाथ : मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. खलाशी जर घाबरून घरात बसला, तर जहाज पुढे कसं जाईल? असं म्हणत राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. मनसे आमदार राजू पाटील हे आज अंबरनाथ शहरात आले होते. यावेळी अंबरनाथ नगरपालिकेत जाऊन नागरी प्रश्नांवर त्यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांची भेट घेतली. (MNS MLA Raju Patil targets Chief Minister Uddhav Thackeray on corona third wave)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवरुन राजू पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेबाबतचा प्रश्न विचारला असता, तिसरी लाट येणार असली तरी खलाशीच घाबरून घरात बसला आहे, त्यामुळे जहाज पुढे कसं जाईल? असं म्हणत राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. दरम्यान, अंबरनाथ शहरातल्या नागरी समस्यांच्या संदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांची भेट घेतली.

यावेळी शहरातील ओला-सुका कचरा प्रश्न आणि अन्य प्रश्नांबाबत राजू पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच यावर योग्य तो तोडगा काढण्याची मागणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘तिसऱ्या लाटेला घाबरून खलाशी घरात बसला’ असल्याचं म्हणत टोला लगावला. त्यामुळे मनसेची एकीकडे भाजपशी वाढत असलेली जवळीक आणि मनसे नेत्यांकडून वारंवार शिवसेनेला डिवचण्याचे सुरू असलेले प्रयत्न यातून राज्यातली राजकीय समीकरणं बदलत असल्याचं पुन्हा एकदा पहायला मिळालंय.

काय आहे तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांच्या मते कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेसारखी घातक नसेल. मात्र, तरीही सावधानता बाळगावी लागणार आहे. तिसऱ्या लाटेत रोज एक लाखाहून अधिक कोरोना रुग्ण सापडू शकतात. परिस्थिती बिघडली तर हा आकडा दीड लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्या लाटेत दररोज कोरोनाचे 4 लाखाहून अधिक रुग्ण सापडत होते. मात्र, 7 मे नंतर ही संख्या हळूहळू कमी झाली. महाराष्ट्र आणि केरळासह ज्यादा रुग्णसंख्या वाढणाऱ्या राज्यांवर कोरोनाचे रुग्ण किती वाढणार हे अवलंबून असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. (MNS MLA Raju Patil targets Chief Minister Uddhav Thackeray on corona third wave)

इतर बातम्या

Video: पुणे महिला सरपंच मारहाण प्रकरणी ट्विस्ट, नव्या व्हिडीओनं सरपंच गोत्यात, आधी कानशिलात लगावल्याचा आरोप

डोक्यात दगड टाकून तरुणाची हत्या, पुण्याच्या चाकणमध्ये एकच खळबळ, हत्येमागे नेमकं कारण काय?