Nashik : शाळेत येण्यासाठी वडिलांच्या डोक्यावर बसून नदी पार करावी लागतेय; नाशिकमधील भयानक वास्तव

| Updated on: Aug 05, 2022 | 9:25 PM

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्याच्या पश्चिमेला दुर्गम भागात असलेला 300 लोकवस्तीचा देवळाचा पाडा. या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून 30 विद्यार्थी या शाळेत पहिली ते चौथी पर्यँत शिक्षण घेतात आणि याच गावाच्या बाजूने दमनगंगा ही नदी वाहते. तर या शाळेत येण्यासाठी मुलांना नदी पार करून यावं लागत ते देखील चक्क आपल्या वडिलांच्या डोक्यावर बसून असा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकला आणि देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या महाराष्ट्रात हे विदारक दृश्य पाहून गोंधळ उडाला.

Nashik : शाळेत येण्यासाठी वडिलांच्या डोक्यावर बसून नदी पार करावी लागतेय; नाशिकमधील भयानक वास्तव
Follow us on

नाशिक : नाशिकच्या पेठ तालुक्यातील देवळाचापाडा येथील शाळेच्या मुलांचा वाहत्या पाण्यातून शाळेसाठी वाट काढतांनाचा व्हिडिओ मोठया प्रमाणात व्हायरल( Horrible reality in Nashik) झाला होता. त्यात हे लहान चिमुकले आपल्या वडिलांच्या डोक्यावर बसून वाहत्या पाण्यातून शाळेसाठी वाट काढतांना दिसत होते. माध्यमांवर ही बातमी झळकल्यानंतर दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी या व्हिडिओची दखल घेत जिल्हा प्रशासनालाच कामाला लावले पण या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी टीव्ही9 ची टीम थेट पोहोचली अवघी 300 लोकवस्ती असलेल्या या पाड्यावर आणि याठिकाणी आल्यानंतर जी सत्यता समोर आली ती डोकं चक्रावणारीच होती. पाहुयात हा ग्राउंड झिरो वरून स्पेशल रिपोर्ट..

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्याच्या पश्चिमेला दुर्गम भागात असलेला 300 लोकवस्तीचा देवळाचा पाडा. या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून 30 विद्यार्थी या शाळेत पहिली ते चौथी पर्यँत शिक्षण घेतात आणि याच गावाच्या बाजूने दमनगंगा ही नदी वाहते. तर या शाळेत येण्यासाठी मुलांना नदी पार करून यावं लागत ते देखील चक्क आपल्या वडिलांच्या डोक्यावर बसून असा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकला आणि देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या महाराष्ट्रात हे विदारक दृश्य पाहून गोंधळ उडाला.

म्हणूनच या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी टीव्ही9 ची टीम या गावात पोहोचली आणि समोर आलं ते वेगळंच सत्य .तर या शाळेत शिकणारे हे विद्यार्थी याच गावात राहतात. तर 4 ते 5 विद्यार्थी हे मात्र नदीच्या पलीकडे असलेल्या आपल्या शेतातच राहतात आणि जर पाऊस खूप झाला आणि नदीला पूर आला तर या 4 ते 5 विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय होते हे खरं असलं तरी आपल्या गावच्या समस्या आणि अडचणींकडे प्रशासनाचं लक्ष जावं म्हणून गावकऱ्यांनीच केलेला हा व्हिडिओचा खटाटोप असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

आम्ही वारंवार सरकार दरबारी आमच्या रस्ता आणि पुलाच्या मागणीसाठी उंबरे झिजवले पण सरकारी काम आणि 6 महिने थांब असाच प्रकार घडत असल्यानं अखेर आम्हाला आता या मुलांच्या शिक्षणाचा सहारा घ्यावा लागत असल्याचं हे गावकरी सांगत असले तरी देखील ही सर्वच मुलं गावातच राहतात फक्त शेतीवर गेले तरच ते देखील जर नदीला पूर असेल तेव्हाच अशी परिस्थिती अवघ्या 4-5 विद्यार्थ्यांची होते असा निर्वाळा येथील शिक्षक विलास शिरोरे यांनी केलाय

या एक व्हिडिओने या प्रशासनाला जाग तर आलीच पण आता प्रत्येक विभागाचा अधिकारी या गावात हजर झाला आहे..याबाबतच येथे विझीट देण्यासाठी आलेल्या तहसिलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांनी

एकूणच काय तर आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी असा व्हिडिओ बनवत प्रशासनाचं लक्ष तर वेधलं पण आपल्या मागण्यांसाठी अशा पद्धतीनं आपल्याच मुलांचा वापर करणं कितपत योग्य हा देखील विचार करणं गरजेचं आहे.