Weather Alert : मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी, नांदेडमध्ये गारपीट, थंडीची लाट कायम

| Updated on: Jan 14, 2022 | 8:37 AM

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढलंय. बारहाळी परिसरात पाऊस आणि गारपिटीची तीव्रता अधिकची होती, त्यामुळे शेतात कापून ठेवलेली तूर पीक भिजल्याने अतोनात नुकसान झालेय.

Weather Alert : मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी, नांदेडमध्ये गारपीट, थंडीची लाट कायम
Weather Alert
Follow us on

मुंबई: भारतीय हवामान विभागाच्यावतीनं (IMD) देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणी आजही पाऊस होण्याची शक्यता आहे. आयएमडीनं चार दिवसांचे हवामानाचे इशारे जारी केले होते. आयएमडीनं विदर्भ आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Unseasonal Rain) होण्याची शक्यता वर्तवली होती. तर, काही ठिकाणी गारपीट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे मराठावाड्यातील नांदेड जिल्ह्यात काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढलंय. बारहाळी परिसरात पाऊस आणि गारपिटीची तीव्रता अधिकची होती, त्यामुळे शेतात कापून ठेवलेली तूर पीक भिजल्याने अतोनात नुकसान झालं आहे.  अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. उत्तर भारतातील स्थिती आणि अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागारातील बदल्यात स्थितीचा महाराष्ट्रावर परिणाम दिसून येत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट पसरली आहे.

के.एस. होसाळीकर यांचं ट्विट

नांदेडच्या मुखेड तालुक्याताल गारपीट

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढलंय. बारहाळी परिसरात पाऊस आणि गारपिटीची तीव्रता अधिकची होती, त्यामुळे शेतात कापून ठेवलेली तूर पीक भिजल्याने अतोनात नुकसान झालं आहे.  या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गव्हू, हरभरा आणि ज्वारीचे देखील मोठे नुकसान झालेय. जवळपास एक तास भर सुरू राहिलेल्या या पावसाने गुरांचे देखील नुकसान झाल्याची माहिती मिळतेय. या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होतेय. तर, परभणीमध्ये देखील काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याची माहिती आहे.

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील 89 गावांना अवकाळीचा फटका

भंडारा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या नुकसानिचा प्राथमिक अहवाल भंडारा जिल्हा प्रशासनाकडून आला असून भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यापैकी एकच लाखांदूर तालुक्यात अवकाळी व गारपीटीने 4 हजार 934 हेक्टर क्षेत्र बाधित केले आहे।विशेष म्हणजे लाखांदूर तालुक्यातील 89 गावांना बसला अवकाळी व गारपिटी फटका बसला आहे

इतर बातम्या:

पिंपरी- चिंचवडमध्ये गृहाप्रकल्पासाठी होतोय अवैध वाळू उपसा : गतवर्षात प्रशासनाने केल्या इतक्या कारवाया

कुरिअर देण्याच्या बहाण्याने रेकी, बँक अधिकाऱ्याच्या घरी सशस्त्र दरोडा, उच्चशिक्षित चोरटे जेरबंद

Weather Forecast unseasonal rain in Marathwada Nanded and Parbhani witness also cold wave